टी-२० विश्वचषकदरम्यान नाणेफेक जिंकणारा संघ बहुतांश वेळा सामन्यात विजयी ठरलेला पाहायला मिळाला आहे. अंतिम सामन्यातही तसेच झाले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियावर खेळल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने पराभूत केले आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. तरीदेखील ऑस्ट्रेलियाने सामन्यात ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर टी-२० विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणारे संघ बहुतांश वेळा जिंकले आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे
संपूर्ण टी-२० विश्वचषकादरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे राहिले आहे. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मागच्या १८ टी-२० सामन्यांपैकी १७ सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी केलेला संघ विजयी ठरला आहे. या १८ सामन्यांत जो एक सामना प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला आहे तो म्हणजे, आयपीएलदरम्यान खेळला गेलेला अंतिम सामना. चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती आणि कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले होते. मात्र, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना तब्बल १९२ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते.
आयसीसी टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर, त्यातही दुसऱ्या डावात फलंदाजी करणारेच संघ यशस्वी झालेले पाहायला मिळातात. टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकातील मागच्या ५ अंतिम सामन्यात ज्या संघांनी दुसऱ्या डावात फलंदाजी केली, त्यांनीच विश्वचषकाचे जेतेपद जिंकले आहे. तसेच यावर्षी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी दुसऱ्यांदा फलंदाजी केली होती आणि ते विजयी ठरले होते.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २०१८ नंतर २० सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १८० धावा केल्या आहेत आणि १९ सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याऱ्या संघ विजयी ठरला आहे. यापैकी एक सामना बरोबरीत सुटला आहे. हे आकडे पाहता टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही प्रथम फलंदाजी करण्याऱ्या संघाने विजय मिळवण्यासाठी १८० पेक्षा जास्त धावा करणे अपेक्षित होते, पण न्यूझीलंड संघ २० षटकात १७२ धावंपर्यंतच मजल मारू शकला आणि परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: विलियम्सनवर चढला पंतचा फिवर, टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये एका हाताने ठोकला षटकार
पती वॉर्नरला कमी लेखणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची कँडिसने चांगलीच जिरवली, ‘अशा’ शब्दांत फटकारले