भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हा गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून होता. त्याने कोरोना काळात गरजू व्यक्तींना अन्नवाटप केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुकही केले गेले होते. परंतु त्याच्यावर काही दिवसांपुर्वी एका वयोवृद्ध दांपत्याने गंभीर आरोप केले होते. यामुळे इरफानला चाहत्यांच्या रोशाला सामोरे लागले होते. परंतु आता त्याच दांपत्यांनी आपण केलेले आरोप खोटे असल्याचे कबूली दिली आहे.
नवा व्हिडिओ पोस्ट करत सय्यद इब्राहिम (तो वयोवृद्ध व्यक्ती) यांनी म्हटले आहे की, “माझे नाव सय्यद इब्राहिम अहमद आहे. मी अहमदाबादच्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेला हवालदार आहे. निवृत्तीनंतरही मी अहमदाबादमध्येच राहतो. ५ मे रोजी माझ्या मुलाने आणि सुनेने इरफान पठाणविरुद्ध जो अफेयरचा व्हिडिओ व्हायरल केला होता. मला त्याबाबत काही गैरसमज झाले होते. त्या हिशोबाने मी तो व्हिडिओ बनवला होता.”
“इरफान भाई निर्दोष आहे. मी त्यांच्याविषयी जे काही बोललो तो खोटे होते. मी इरफान भाईची क्षमा मागतो. मी अल्लाहचीही क्षमा मागतो. इरफान भाई आणि त्यांच्या चाहत्यांच्याही क्षमा मागतो. कृपा करुन मला क्षमा करा. हा व्हिडिओ मी कोणाच्या दबावाखाली येऊन बनवलेला नाही. माझ्या कुटुबीयांच्या सहमतीने मी हा व्हिडिओ बनवला आहे,” असे त्यांनी शेवटी सांगितले.
https://twitter.com/tabrezhasan111/status/1390987414924009475?s=20
नक्की काय आहे प्रकरण
त्या वयोवृद्ध व्यक्तीने इरफान पठाणचा आपल्या सूनेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच त्याने असेही आरोप केले होते की, आपली ओळख जास्त असल्याने त्याने त्या वृद्धाला आणि त्यांच्या मुलाला धमकावले देखील होते. यानंतर त्या वयोवृद्ध व्यक्तीने एक व्हिडिओ काढून शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, “जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर, आम्ही आत्महत्या करू.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
मुलाने केला होता धक्कादायक खुलासा
इब्राहिम यांची सून इरफान पठाणची चुलत बहीण आहे. तसेच इब्राहिम यांचा मुलगा सय्यदने म्हटले होते की, “माझी पत्नी आणि इरफान पठाण यांचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. तसेच लग्नानंतरही अवैध संबंध आहेत. इरफान आणि माझी पत्नी नेहमी व्हिडिओ कॉलिंग करत असतात. ते लपून छपून अनेकदा फिरायला देखील गेले आहेत. ही गोष्ट कुटुंबियांच्या निदर्शनात येताच तिने आमच्यावर हुंड्यासाठी माझा छळ करतात असे आरोप केले होते.”
https://twitter.com/gopugoswami/status/1390554380319944706?s=20
https://twitter.com/Satynistha/status/1389992448684818435?s=20
परंतु आता इब्राहिम यांच्या स्पष्टीकरणानंतर इरफान पठाण निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाणवर वृद्ध दांपत्याचा सुनेसोबत अवैध संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप, दिली आत्महत्या करण्याची धमकी
चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण