यंदाच्या ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी’चे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. तत्पूर्वी मोठी माहिती समोर येत आहे. खरे तर 160 हून अधिक ब्रिटिश राजकारण्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) अफगाणिस्तानविरूद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकण्याची विनंती केली आहे. तालिबान राजवटीकडून महिलांच्या हक्कांवर होणाऱ्या दडपशाहीविरूद्ध ईसीबीने आवाज उठवला पाहिजे, असे या नेत्यांचे मत आहे.
मात्र, यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटचे प्रत्युत्तर आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारे (26 फेब्रुवारी) रोजी इंग्लंड विरूद्ध अफगाणिस्तान (England vs Afghanistan) संघात सामना होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने तालिबानच्या महिलांविरोधातील कायद्यावर कडाडून टीका केली असली, तरी त्याचा सामन्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.
याआधी लेबर खासदार टोनिया अँटोनियाझी यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (England Cricket Board) पत्र लिहिले होते. ज्यावर निगेल फॅरेज आणि जेरेमी कॉर्बिन यांच्यासह हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉर्ड्सच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात हे सांगण्यात आले आहे. आम्ही इंग्लंडच्या पुरुष संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना तालिबानच्या अंतर्गत अफगाणिस्तानात महिला आणि मुलींशी होणाऱ्या गैरवर्तनाच्या विरोधात बोलण्याची विनंती करतो. या पत्रात पुढे म्हटले आहे की, आम्ही ईसीबीला विनंती करतो की, अफगाणिस्तानविरूद्धच्या आगामी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करावा, जेणेकरून असे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या युवा खेळाडूनं जिंकली चाहत्यांची मनं, ऑस्ट्रेलियाच्या लहान मुलाला दिली बॅट
हा गोलंदाज असता तर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली असती, पाँटिंगचे धक्कदायक विधान
हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पात्र नाही, पण तरीही त्याला संधी मिळणार