माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खेळताना आपण पाहिले आहे. परंतु, नुकताच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला हा हेलिकॉप्टर शॉट बॅटने नाही तर चक्क गोल्फ स्टिकने खेळताना पाहण्यात आले आहे. त्याच्या या गोल्फ स्टिकने खेळलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
राशिद खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, ‘तुम्ही कधी आपल्या गोल्फ स्टिकने असं खेळून पाहिले आहे का?’
राशिद खानच्या या व्हिडिओवर इंग्लंड संघाचा माजी आक्रमक फलंदाज केविन पीटरसनने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. केविन पीटरसनने यावर आपली प्रतिक्रिया दिली की, ‘हा स्विच हिट आहे का?’ पीटरसनच्या या प्रतिक्रियेवर राशिदने म्हटले आहे की ‘तू मला तो स्टिच हिट शिकण्याची गरज आहे.’
https://www.instagram.com/p/CQ6ak7shKtZ/
इतकेच नव्हे तर इंग्लंड महिला संघाची स्टार फलंदाज डेनिएल वॅटने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. डेनिएल वॅटने प्रतिक्रिया देत हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे.
वॅट ही नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिने यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. भारतात ती साल 2014 मध्ये पहिल्यांदा चर्चेत आली होती. त्यावेळी तिने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नासाठी मागणी घातली होती. तिने साल 2010 मध्ये भारतीय दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केली होते.
राशिद खान नुकताच पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसला होता. तो अफगाणिस्तान संघातील महत्त्वाचा खेळाडू असून त्याने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेकदा संघाला विजय मिळवून दिले आहेत. तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन काही आक्रमक फटकेही मारतो.
त्याने आत्तापर्यंत ५ कसोटी सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत आणि १०६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ७४ वनडेत १४० विकेट्स आणि १००८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत त्याने ९५ विकेट्स घेतल्या आहेत आणि १७९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी लोकांना खूश करण्यासाठी खेळत नाही,’ कर्णधार मितालीची टिकाकारांना सणसणीत चपराक
इंग्लंडच्या भूमित नुकतेच पराभूत होऊनही विराटसेना यजमानांवर करेल मात; बड्या खेळाडूने सांगितले कारण