भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. या कसोटी दरम्यान करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघासाठी फिरकीचा जादुगार असलेला सर्वात अनुभवी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने सामना संपताच आपली निवृत्ती जाहीर केली. आर आश्विनने पत्रकार परिषदेत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.
आर अश्विनने भारताला अनेक वेळा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान अश्विनने निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी तो ड्रेसिंग रूममध्ये भावूक दिसत होता. विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला मिठी मारली. आज (18 डिसेंबर) सामना संपल्यानंतर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आर अश्विन स्वत: सामन्यानंतर कर्णधार ‘रोहित शर्मा’सोबत (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत आला आणि त्याने तत्काळ निवृत्तीची घोषणा केली.
या बातमीद्वारे आपण भारतीय संघाचा फिरकीचा जादूगार ‘रविचंद्रन अश्विन’ची (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द जाणून घेऊया.
आर अश्विनने भारतासाठी 106 कसोटी, 116 एकदिवसीय आणि 65 टी20 सामने खेळले. यापैकी त्याने 106 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 537 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला 200 डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तो 37 वेळा 5 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. तर 8 वेळा तो सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे. 59 धावांत 7 विकेट्स आणि 140 धावांत 13 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
अश्विनने 116 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अश्विनला एकदाही 5 विकेट्स घेता आल्या नाहीत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने 65 सामन्यात 72 विकेट्स घेतल्या.
अश्विनने भारतासाठी अनेक सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करून भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. त्याने 106 कसोटी सामन्याच्या 151 डावात फलंदाजी करताना 3,503 केल्या. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 25.75 होती. अश्विनने कसोटीत 14 अर्धशतकांसह 6 शतके देखील झळकावली आहेत. 124 धावा ही त्याची त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
116 एकदिवसीय सामन्यात अश्विनने 116 सामन्याच्या 63 डावात फलंदाजी करताना 707 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 86.96 राहिला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 1 अर्धशतक देखील झळकावले आहे. तर 65 टी20 सामन्याच्या 19 डावात फलंदाजी करताना त्याने 26.28च्या सरासरीने 184 धावा केल्या. नाबाद 31 धावा ही त्याची टी20 मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
रविचंद्रन अश्विनची अविश्वसनीय कामगिरी-
287 आंतरराष्ट्रीय सामने
4394 आंतरराष्ट्रीय धावा
765 आंतरराष्ट्रीय विकेट्स
6 शतके
कसोटी इतिहासात सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा संयुक्त दुसरा क्रमांक (37)
250 कसोटी विकेट्स घेणारा सर्वात जलद (45)
300 कसोटी विकेट्स घेणारा सर्वात जलद (54)
भारतासाठी सर्वाधिक 350 कसोटी विकेट्स घेणारा संयुक्त दुसरा क्रमांक (66)
भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज (765)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा (195)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके (11)
2011चा एकदिवसीय विश्वचषक विजेता
2013चा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता
आशिया कप 2010चा विजेता
2016चा आयसीसी पुरुषांचा क्रिकेटर ऑफ द इयर
2016चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले
ना भारताचा ना ऑस्ट्रेलियाचा, गाबा कसोटी पावसाचा, खराब हवामानामुळे सामना अनिर्णित..!
पर्थनंतर ब्रिस्बेनमध्येही ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर कोसळली, 20 वर्षांत दुसऱ्यांदा असं घडलं