रविवारी (22 ऑक्टोबर) इंग्लंडने त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज रीस टोपली हा बोटाच्या दुखापतीमुळे विश्वचषक 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर गेल्याची घोषणा केली होती आणि एका दिवसानंतर, त्याच्या जागी नव्या खेळाडूचे नाव देखील समोर आले आहे.
रीस टोपली (Reece Topley) याच्या जागी इंग्लंड क्रिकेट संघाने ब्रायडन कार्स (Brydon Carse) याचा संघात समावेश केला आहे, तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. आयसीसीनेही कार्सच्या इंग्लंड संघात समावेश करण्यास मान्यता दिली आहे. 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रीस टोपलीला त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर त्याने बोटाला टेप लाऊन गोलंदाजी केला होती आणि त्याने दोन विकेट्सही घेतल्या होत्या. मात्र, सामन्यानंतर झालेल्या स्कॅनमध्ये त्याच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याची पुष्टी झाली आणि त्यामुळे तो यापुढे इंग्लंडकडून या स्पर्धेत खेळणार नाही असं संघाकडून सांगण्यात आलं.
अशा परिस्थितीत इंग्लंडने रीस टोपलीच्या जागी 2021 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रेडेन कार्सची उर्वरित विश्वचषकातील सामन्यांसाठी निवड केली आहे. कार्सने इंग्लिश संघासाठी 12 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. उजव्या हाताच्या या खेळाडूने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत आणि 124 धावा केल्या आहेत.
जर गतविजेत्या इंग्लंडबद्दल कामगिरीकडे पाहिले तर त्यांची या स्पर्धेत आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे आणि चार सामन्यांत तीन पराभवांसह 2 गुणांसह ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. आता प्रत्येक सामना त्यांच्यासाठी जवळजवळ करा किंवा मरा झाला आहे आणि आता या परिस्थितीत ते कशी कामगिरी करतात हे पहावे लागणार आहे. इंग्लंड संघाचा विश्वचषकातील पुढील सामना 26 ऑक्टोबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. (The entry this dangerous bowler in Replace of Reece Topley in the England team after taking so many wickets)
महत्वाच्या बातम्या –
पाचव्या सामन्यात हा ठरला भारताचा ‘बेस्ट फिल्डर’! थेट ‘स्पायडर कॅम’ने आले मेडल
स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, श्रीराम क्रीडा विश्वस्त कुमार गटात अंतिम फेरीत