भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship 2023-25) फायनल फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच घरच्या मैदानावर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी पोहोचल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. इथून आफ्रिकेला फायनल फेरीत प्रवेश करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला फायनल फेरीत स्थान मिळवण्यासाठी सुमारे 3 विजयांची आवश्यकता असेल. या बातमीद्वारे आपण भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल फेरीत स्थान मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. हे जाणून घेऊया.
भारताने गेल्या 5 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत. भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. इथून भारताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून न राहता फायनल फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यात किमान 2 विजय मिळवावे लागतील. याशिवाय त्यांना एक कसोटी ड्रॉ करावी लागेल. या स्थितीत ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरूद्धचा 2-0 असा विजयही भारतासाठी चिंताजनक ठरणार नाही.
जर भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) 2-1 ने संपवली, तर ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करून पुढील मालिकेत पुढे राहू शकेल. आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-2 ने संपली आणि ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया 55.26% वर बरोबरीत राहतील. याशिवाय बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा 1-2/1-3/1-4 असा पराभव झाला तर त्यांचे फायनल फेरीत जाण्याचे स्वप्न पूर्णतः भंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; गाबा कसोटी खेळणार नाही जसप्रीत बुमराह? ऑस्ट्रेलिया खेळाडूचा मोठा दावा
पंजाबने लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूची विस्फोटक खेळी, संघाला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये
अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची धमाल फलंदाजी, मुंबईचा संघ विजेतेपदापासून केवळ दोन पावलं दूर