ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे ते त्यांच्या घरात वेळ घालवत आहेत. असे असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. जोन्स हे त्यांच्या कमेंट्स आणि उत्तरांमुळे चर्चेत येत असतात. असंच काहीतरी रविवारी (१२ एप्रिल) घडले.
सोशल मीडियावर एका चाहत्याने जोन्स (Dean Jones) यांना त्यांच्या मुलीबद्दल वैयक्तिक प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांनी चाहत्याला सनसनीत उत्तर देत त्याचे तोंड बंद केले आहे.
जोन्सला एका चाहत्याने त्यांच्या मुलीच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला होता. यावर जोन्स यांनी हुशारीने उत्तर दिले आहे.
जोन्स यांची मुलगी ऑगस्टाचा रविवारी वाढदिवस (Birthday) होता. या दरम्यान त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर चाहत्यांनीही ऑगस्टाला (Augusta) वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु एका चाहत्याने थेट तिच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला.
Happy birthday to my beautiful daughter Augusta. 😘😘🎂🎂🎂 pic.twitter.com/DPoKbCC0nh
— Dean Jones AM (@ProfDeano) April 11, 2020
साधारण पणे असा प्रश्न कोणीही विचारला तर साहजिकच वडिलांना राग येऊ शकतो. परंतु जोन्स यांनी त्या चाहत्याला मजेशीरपणे उत्तर देत म्हटले की, “ऑगस्टा सिंगल नाही. ती सध्या रिलेशनशिपमध्ये आहे.”
No… 🤣 https://t.co/jymOER7VaU
— Dean Jones AM (@ProfDeano) April 12, 2020
जोन्स पुढे म्हणाले की, “मी १९९५ मध्ये ऑगस्टा गोल्फ कोर्टमध्ये (Augusta Golf Court) द मास्टर्स पहायला गेलो होतो. त्याचवर्षी माझ्या मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे मी माझ्या मुलीचे नाव ऑगस्टा गोल्फ कोर्टच्या नावावरून ठेवले आहे.”
जोन्स हे बराच काळ आयपीएलचा भाग होते. स्कॉट स्टायरिस, अनिल कुंबळे, माइक हेसन, ब्रेट ली आणि यांसारख्या अनेक दिग्गजांसह ते एक्सपर्ट पॅनलमध्ये काम करत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कपिल देव यांना पैशांची गरज नाही, पण बाकी लोकांना आहे
-वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू