Fastest win in cricket history: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. यात कधी काय होईल याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याने क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले आहे. एका वनडे सामन्यात एका संघाने फक्त 5 चेंडूत विजय मिळवला आहे. हा वनडे सामना पूर्ण 50 षटकांचा होता. तुम्हाला वाटेल की हे कसे शक्य आहे? पण, हे खरं आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण हा सर्व प्रकार जाणून घेऊयात. (Canada vs Argentina U-19 cricket)
ही घटना आयसीसी पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप अमेरिका क्वालिफायरच्या एका सामन्यात घडली आहे. जिथे कॅनडाच्या अंडर-19 संघाने अर्जेंटिनाच्या अंडर-19 संघाला 50 षटकांच्या सामन्यात फक्त 5 चेंडूत हरवले. या सामन्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. (5-ball win in ODI)
या सामन्यात अर्जेंटिना अंडर-19 संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कॅनडा अंडर-19 संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर अर्जेंटिना अंडर-19 चा संघ अवघ्या 19.4 षटकात फक्त 23 धावांवर ऑलआउट झाला. (Argentina U-19 all out 23) संघाचे 7 खेळाडू खाते न उघडताच तंबूत परतले. संपूर्ण संघातर्फे फक्त एक चौकार आणि एक षटकार लगावण्यात आला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, संघातील कोणताही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.
24 धावांचे माफक लक्ष्य कॅनडा अंडर-19 संघाने फक्त 5 चेंडूतच पार केले. कॅनडा अंडर-19 संघासाठी युवराज सामराने 4 चेंडूत 2 चौकारांसह 2 षटकार मारले. (Yuvraj Samra Canada U-19) अर्जेंटिनाच्या संघाने 3 अतिरिक्त धावा दिल्या. तर दुसरा सलामीवीर फलंदाज धर्म पटेलने 1 चेंडूत 1 धाव काढली. अशा प्रकारे 5 चेंडूतच 24 धावांचे लक्ष्य गाठले गेले. (Fastest chase in cricket)






