आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 जून 1938 ही तारीख खुलच महत्वाची आहे. आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेट घरोघरी पोहोचले आणि याची लोकप्रियता प्रचंड वाढली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघातील ऐतिहासिक कसोटी सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला होता. इतिहासात पहिल्यांदाच एकाध्या क्रिकेट सामन्याचे टीव्हीवर प्रसारन केले गेले होते.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) क्रिकेटच्या बाबतीत आधीपासूनच कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. 1938 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. दोन्ही संघांनी या सामन्यात जिंकण्यासाठी आपले 100 टक्के योगदान दिले. मात्र, सामन्याचा निकाल अखेर लागलाच नाही.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 494 धावांचे मोठे लक्ष्य ऑस्ट्रेलियापुढे ठेवले. कर्णधार वॅली हॅमंड यांनी सर्वातधिक 240 धावांची खेळी केली होती. त्याव्यतिरिक्त एडी पेंटर यांनी 99 धावांचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियानेही चांगले प्रदर्शन करत पहिल्या डावात 422 धावा केल्या. पहिला डाव संपल्यानंतर इंग्लंड संघ 72 धावांनी आघाडीवर होता. ऑस्ट्रेलियाकडून बिल ब्राउन याने द्विशतक ठोकले. त्याने 370 चेंडूत 206 धावांची खेळी केली.
सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने 8 बाद 242 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 315 धावांचे लक्ष्य मिळआले. पण पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ 6 विकेट्सच्या नुकसानावर 204 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियन संघासाठी सर डॉन ब्रॅडमन यांनी दुसऱ्या डावात 102 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. ब्रॅडमन यांच्या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियन संघच्या विकेट्स टिकून राहिल्या, असे सांगितले जाते. (The first televised Test match was played at the @HomeOfCricket in 1938)
महत्वाच्या बातम्या –
“तर मी नाही खेळणार”, लॉर्ड्स कसोटीआधी अँडरसनची थेट ईसीबीला धमकी, कारण घ्या जाणून
पुजाराला मिळणार सेकंड चान्स! ‘या’ स्पर्धेत सूर्यासह दाखवणार दम