ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी (14 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना पावसामुळे रद्द झाला. तसेच इंग्लंडने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिका आधीच जिंकली होती, मात्र शेवटच्या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडसोबत मंकडींग प्रकरण ताजे असताना पुरूष संघासोबतही तसे होण्याची वेळ आली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने गोलंदाजीदरम्यान जोस बटलर याला चेतावणी दिली. हे प्रकरण आणखी एका कारणाने गाजत आहे.
झाले असे की, इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) मंकडींगचा शिकार होता होता वाचला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने त्याला तसा इशाराही केला होता. हा व्हिडिओ सध्या क्रिकेटवर्तुळात चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्टार्कने भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्पिनर दीप्ति शर्मा हीचे नाव घेतले. यामुळे भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याला फटकारले आहे.
स्टार्क-बटलरच्या या मकडींगच्या व्हिडिओला भारताचे माजी क्रिकेटपटू हेमंत बदानी यांनी रिट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, ‘स्टार्क मोठे व्हा, तुम्हाला नॉन-स्ट्रायकरला बाद करायचे नसून त्याला फक्त ताकीद द्यायची असले हा तुमचा निर्णय आहे, मात्र दीप्तिचे नाव मध्ये नाही घ्यायला पाहिजे होते. तिने जे केले ते क्रिकेटच्या नियमानुसार बरोबर होते. क्रिकेटविश्व तुमच्याकडून अशा बाबींची अपेक्षा करत नाही.’
काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाची खेळाडू दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने इंग्लंडची खेळाडू चार्ली डीन (Charlie Dean) हिला मंकडींगने बाद केले होते. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आयसीसीने 1 ऑक्टोबरपासून मंकडींग हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगितले. एखादा फलंदाज गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी आपली क्रीझ सोडली, तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. विशेष म्हणजे, हा निर्णय यापूर्वीही लागू झाला होता. मात्र, हे सर्व खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे सांगितले गेले होते.
Grow up Starc. That’s really poor from you. What Deepti did was well within the rules of the game. If you only want to warn the non striker and not get him out that’s fine and your decision to make but you bringing Deepti into this isn’t what the cricket world expects of you https://t.co/vb0EyblHB8
— Hemang Badani (@hemangkbadani) October 15, 2022
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी डावाच्या पाचव्या षटकात चेंडू टाकण्यासाठी परतताना मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने जोस बटलर (Jos Buttler) याला क्रीझमधून बाहेर न पडण्याची चेतावणी दिली नाही. यानंतर बटलरनेही स्टार्कला प्रत्युत्तर दिले. खरं तर, या सामन्यात बटलरने 41 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी साकारली. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागला नाही.
तसेच बटलर यापूर्वी दोन वेळा मंकडींगने धावबाद झाला आहे.
जोस बटलर मंकडींग
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा दोन वेळा मंकडींगचा (Jos Buttler Mankading) शिकार झाला आहे. सन 2014 मध्ये त्याला पहिल्यांदा श्रीलंकन गोलंदाज सचित्र सेनानायके याने धावबाद केले होते. दुसरीकडे, आयपीएल 2019 मध्ये आर अश्विन याने बटलरला मंकडींगने धावबाद केले होते. त्यावेळी भलताच वाद पेटला होता. अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा डॉन भारतच! आतापर्यंत खेळलेल्या हंगामात विरोधी संघाना चारली धूळ, आकडेवारी पाहाच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन हुशार आशियाई कर्णधार, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी दिले अमूल्य योगदान