इंडियन प्रीमियर लीग 2020 दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या तंदुरुस्ती आणि फॉर्मबद्दल सतत प्रश्न उपस्थित होत राहिले. त्याचे कारण म्हणजे आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि फलंदाजीतील त्याचा संघर्ष. धोनी जवळपास एका वर्षाच्या अंतरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला होता. वैयक्तिकरित्या आणि कर्णधार म्हणूनही त्याचा आयपीएलचा 13 वा हंगाम खूपच खराब राहिला आहे. त्यानंतर आता माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी धोनीच्या पुढील आयपीएल खेळण्याबाबत वक्तव्य केले आहे.
चेन्नईच्या अंतिम लीग सामन्यात नाणेफेकी दरम्यान धोनीला आयपीएल 2020 नंतर निवृत्ती बाबत विचारले असता तो स्पष्टपणे नाही म्हणाला. त्यावर किरण मोरे म्हणाले की, टी -20 लीगमधून निवृत्त होण्याचा निर्णय हा धोनीचाच असावा.
किरण मोरे पुढील हंगामासाठी चेन्नईचे समर्थन करत म्हणाले की, तीन चषक जिंकणे सोपे नाही. पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. चेन्नईला त्यांचा संघ पुन्हा उभा करण्यासाठी बरेच काम करावे लागेल.
पुढे बोलताना मोरे म्हणाले, “गेल्या 13 वर्षात, कदाचित आपले एक वर्ष खराब होवू शकते. चेन्नईचे असे झाले याबाबत आपण जास्त विचार करून जमणार नाही. चेन्नईने तीन वेळा जेतेपद जिंकले आहे. धोनी महान आहे आणि आपण हे विसरू नये. तीन विजेतेपद मिळवणे हा मोठा विक्रम आहे.”
आयसीसी वनडे विश्वचषक 2019 च्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर, एम एस धोनीच्या मैदानात पुनरागमन करण्याच्या आशा लागून होत्या. परंतु धोनीच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांचा देखील हिरमोड झाला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान धोनीने 14 सामन्यांत 116 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 200 धावा केल्या. खराब फलंदाजीमुळे त्याचा आयपीएलमधील हा सर्वात वाईट हंगाम ठरला. धोनीच्या या कामगिरीनंतर दिग्गजांनी त्याच्या फिटनेस व फॉर्मसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
एमएस धोनीच्या खराब कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. तीन वेळा विजेत्या चॅम्पियनने 14 सामन्यांत अवघ्या 12 गुणांची नोंद केली आणि गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर जागा बनवली. मात्र चेन्नईने या हंगामातील त्यांचा अंतिम सामना खेळल्यानंतर कर्णधार एमएस धोनीने 2021 मध्ये आपल्या संघासह परत येण्याची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
-“भारताच्या ‘या’ राज्यात बनेल एमएस धोनीचे मंदीर,” माजी क्रिकेटरचे मोठे विधान
ट्रेंडिंग लेख-
-…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
-…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!






