भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा टी20 सामना वांडरर्स स्टेडियम स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 284 धावांचा डोंगर उभारला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो संघासाठी अतिशय योग्य ठरला. प्रथंम फलंदाजी करताना भारतीय संघाने आफ्रिकेपुढे 284 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात सलामीवीर संजू सॅमसनने (Samson) धमाकेदार शतक झळकावत इतिहास रचला. त्याने 56 चेंडूत 109 धावांची तुफानी खेळी केली, तर तिलक वर्माने (Tilak Verma) देखील धमाकेदार अंदाजात फलंदाजी करून शानदार शतक झळकावले. त्याने 47 चेंडूत 120 धावा कुटल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीने डोकंच वर काढू दिलं नाही. या 2 खेळाडूंमध्ये 86 चेंडूत 210 धावांची भागिदारी झाली. आफ्रिकेसाठी सिपमला हा एकमेव गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी ठरला. भारताने आता एका विकेटच्या मोबदल्यात आफ्रिकेपुढे 284 धावांचे आव्हान ठेवले आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका-रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन(यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला
13 वर्षांचा मुलगा ऑक्शनमध्ये उतरणार! मेगा लिलावातील सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू जाणून घ्या
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत ‘या’ 3 खेळाडूंचा चिंताग्रस्त फाॅर्म वाढवणार भारतीय संघाचं टेन्शन!
IND vs SA; भारताने जिंकला टाॅस प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11