---Advertisement---

Mumbai Indians । नवा कर्णधार निवडला पण फ्रँचायझीसाठी रोहित अमूल्य! खास व्हिडिओतून दिला ट्रिब्यूट

On: शुक्रवार, डिसेंबर 15, 2023 7:58 PM
Rohit Sharma
---Advertisement---

मुंबई इंडियन्सला आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी बनवणारा रोहित शर्मा आता या संघाचे नेतृत्व करणार नाही. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शुक्रवारी (15 डिसेंबर) हार्दिक पंड्या याला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. कर्णधार म्हणून हार्दिकने स्वतःला सिद्ध केल्यानंतर त्याला ही जबाबदारी मिळाली. पण रोहितचे चाहते मात्र नाराज झाल्याचे दिसते. अशातच मुंबईने रोहितचा आयपीएलमधील प्रवास दाखवणारा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेला. पुढे 2013 हंगामात रिकी पाँटिंगने अचानक माघार घेतल्यानंतर रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. मागच्या दहा आयपीएल हंगामांमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराच्या रुपात यशस्वी ठरत आला. पण आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझीने हार्दिक पंड्याला याला कर्णधारपद सोपवले. हा निर्णय नक्कीच फ्रँचायझीसाठीही सोपा नव्हता. मुंबईच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या व्हिडिओतून रोहितला कर्णधारपदावरून हटवणे मुंबईसाठी किती कठीण होते, हे समजू शकते.

रोहित मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेल्यापासून आतापर्यंतचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. व्हिडिओत रोहितचा नेहमी हसून खेळून असणारा स्वभाव पाहायला मिळतो. चाहत्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडत आहे.

दरम्यान, हार्दिक पंड्या देखील मुंबई इंडियन्सच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे. 2015 मध्ये त्याला पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मुंबईकडून मिळाली होती. त्याने सुरुवातीच्या काही हंगामांमध्येच आपण भारतीय क्रिकेटचे भविष्य असल्याचे सिद्ध केले होते. पण मागच्या दोन हंगामांमध्ये हार्दिक पंड्या मुंबईसाठी खेळू शकला नाही. आयपीएल 2022 आधी झालेल्या मेगा लिलिवात हार्दिकला गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले. आपल्या लहिल्याच आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स हार्दिकच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकला. मागच्या आयपीएल हंगामात देखील हार्दिकने गुजरातला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. पण चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (The franchise has shared a tribute video for Rohit Sharma after Hardik Pandya was named as the new captain of Mumbai Indians.)

महत्वाच्या बातम्या – 
एम. जे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धा । मध्य रेल्वे व के पी इलेव्हन यांचे दणदणीत विजय
BREAKING! रोहित पर्वाचा शेवट, हार्दिक पंड्या बनला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---