मुंबई उपनगर कबड्डी क्षेत्रातील मान्यवरांच्या ग्रुप तर्फे युवा प्रेरणा स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ पुरस्कृत करण्यात आला आहे. यांचे अध्यक्ष रमेश प्रभू आहेत. रमेश प्रभू हे मुंबई उपनगर कबड्डी असो. चे माजी सरचिटणीस होते. संघ प्रशिक्षक म्हणून सतीश चव्हाण हे काम पाहणार आहेत. तर प्रभाकर लकेश्री हे संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
उजवा मध्यरक्षक आणि चढाईपटू आकाश म्हात्रेवर ९,००० रुपयेची बोली लावून युवा प्रेरणा संघाने आपल्या संघात घेतलं आहे. तर घाटकोपर विभागातून महेश लाड तर उपनगर विभागातून विघ्नेश पवार हे दोन स्टार खेळाडु आहेत. महेश लाड, विघ्नेश पवार, अंकुश गुरव, आकाश म्हात्रे अष्टपैलू खेळाडूचा भरणा संघात आहे.
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ च आयोजन करण्यात येत आहे.
युवा प्रेरणा स्पोर्ट्स अकॅडमी
१) प्रप्फुल बांगर
२) सौरभ गावडे
३) विकास शिंदे
४) महेश लाड
५) महेश डोंगरे
६) आकाश म्हात्रे
७) अंकुश गुरव
८) दिनेश जाधव
९) अक्षय बंगेरा
१०) मयुरेश गुजर
११) विघ्नेश पवार
१२) संदेश कलंबटे
प्रशिक्षक– सतीश चव्हाण
व्यवस्थापक- प्रभाकर लकेश्री