---Advertisement---

‘डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम’मध्ये ‘द ग्रेट खली’चा समावेश, घोषणेने झाला भावुक

On: गुरूवार, मार्च 25, 2021 8:08 PM
---Advertisement---

माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि भारतीय दिग्गज द ग्रेट खली उर्फ दिलीप सिंग राणा याच्या कारकिर्दीला अजून एक सोनेरी किनार जोडली जाणार आहे. त्याचा लवकरच डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम २०२१ मध्ये समावेश होणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूई इंडियाने व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली आहे. खलीसह अंडरटेकर आणि केन यांनाही हॉल ऑफ फेममध्ये सामील केले जाणार आहे.

ही आनंदवार्ता खलीला त्याचा मॅनेजर आणि जुना मित्र रंजन सिंह याच्याकडून मिळाली. ही बातमी मिळाल्यानंतर खली भावुक झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी होते. ते देखील हे वृत्त ऐकून भावनिक झाल्याचे दिसले.

हॉल ऑफ द फेममध्ये निवड झाल्यानंतर ‘ट्रिपल एच’ने खलीचे अभिनंदन केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे त्याने लिहिले आहे की, ‘खली हॉल ऑफ फेममध्ये सामील होणे ही भारतासाठी गर्वाची बाब आहे. खली सध्या भारत देशात नवी प्रतिभा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. ही एक उत्तम गोष्ट आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन.’

खली हा एक असा रेसलर आहे, ज्याने भारतातील रेसलिंग क्षेत्रामधील प्रतिभा पूर्ण जगाला दाखवून दिली आहे. त्याने ७ एप्रिल २००६ रोजी स्मॅकडाउनमझ्ये प्रवेश केला होता. त्यावेळी द अंडरटेकर आणि मार्क हेनरी यांची लढत चालू होती. यावेळी लढतीदरम्यान खलीची एंट्री झाल्याचे पाहून अंडरटेकरही दंग झाला होता. खलीने आपल्या मुव्हने अंरटेकरला रिंगमध्ये चित केले होते.

खलीने त्याच्या रेसलिंग कारकिर्दीत आतापर्यंत अनेक किर्तीमान आपल्या नावे केले आहेत. वयाच्या ४८ व्या वर्षी त्याला हा सन्मान मिळणे फार मोठी गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर

नव्वदीत बाद झालेल्या डिकवेल्लाने गाळले नावातील ‘K’ अक्षर, कारण गुलदस्त्यात

प्रसिद्ध-कृणालने उधळले इंग्लंडचे मनसुबे; पाकिस्तानी दिग्गज म्हणाले, ‘भारतात क्रिकेटर जन्माला घालणारी मशीन’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---