पुणे: बुद्धिबळात सातत्याने अत्यंत जागरूक राहून अचूक चाली कराव्या लागतात. एकही चाल चुकली, तर डाव हातचा जाऊ शकतो. म्हणूनच बुद्धिबळासारख्या खेळामुळे आपल्याला सतत जागरूक राहण्याची, चुका टाळण्याची सवय लागते. हीच सवय कायम ठेवून आगामी स्पर्धेत यशस्वी व्हा, असा कानमंत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित खेळाडूंना दिला.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे आज प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष ड़ॉ. परिणय फुके, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व निमंत्रक अशोक जैन आणि मानद सचिव निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत भारतासह 24 देशांमधील 140 खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यात 17 ग्रॅन्डमास्टर्स, महिला ग्रॅन्डमास्टर्स आणि 29 आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत 2000 पेक्षा जास्त एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे.
या स्पर्धेबरोबरच 1 ते 4 जुन दरम्यान पुणे ओपन बुद्धिबळ स्पर्धाही होणार असून त्यात 2000 पेक्षा कमी एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे. बुद्धिबळाप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली, तर पराभव ठरलेलाच. आम्हीही 2019 च्या विधानसबा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो होतो. तशा चुका तुम्ही करू नका, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
कोणताही खेळ खळताना त्यातील खाचाखोचा नीट समजावून घ्या, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला अनेक ग्रॅन्डमास्टर दिले आहेत आणि आता युवा खेळाडू तोच वारसा पुढे चालवीत आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंचा भरघोस सहभाग पाहून मला खूपच आनंद होत आहे. फिडे नियमानुसार ही स्पर्धा होत असल्याने अनेकांना या स्पर्धेतून ग्रॅन्डमास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळविण्याची संधी आहे. खिलाडू वृत्ती, खेळभावना आणि स्पर्धात्मकता हे गुण ज्याच्याकडे असतात, तो स्पर्धाही जिंकतो आणि खर्या आयुष्यातही यश मिळवितो.
बुद्धिबळासारख्या खेळात तुमच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात समोरच्या खेळाडूच्या कौशल्याचा नीट अभ्यास करणेही महत्त्वाचे असते. नेमकी हीच गोष्ट तुम्हाला स्पर्धेत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी पडेल, असे सांगून महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, आम्ही असा अभ्यास केल्यामुळेच 2019 विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलो. हीच परंपरा यापुढेही कायम राहील.
गेल्या दोन वर्षांच्या ाकलावधीत सारे काही ठप्प जाले होते. त्यामुळे क्रीडाक्षेत्रालाही फटका बसला. परंतु आता सारे काही रुळावर येत असून आम्ही गेल्या चारपाच महिन्यांतच अनेक स्पर्धा घेतल्या आहेत, असे सांगून श्री. केदारी म्हणाले की, महाराष्ट्र ओपन स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच प्रतिथयश खेळाडूंनाही चांगले व्यासपीठ मिळाले आहे.
‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर चालू असल्याचे सांगून श्री. केदार म्हणाले की, या सगळ्याचा पुरेपूर फायदा खेळाडू निश्चितच करून घेतील. महाराष्ट्रात या वर्षअखेरपर्यंत अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत