---Advertisement---

आयसीसीची ‘मोठी’ कारवाई! यावर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 12:07 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वेचा ऑफस्पिनर रॉय कैय्या याच्या चुकीच्या गोलंदाजीबद्दल कठोर कारवाई केली आहे. त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास तात्काळ बंदी घातली आहे. आयसीसीने मंगळवारी याची पुष्टी केली.

गेल्या महिन्यात हरारे येथे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीदरम्यान या ऑफस्पिनरच्या गोलंदाजी शैलीबाबत तक्रार होती. या सामन्यात त्याने २३ षटके टाकली. पण तो एकही विकेट घेऊ शकला नाही. तरी कैय्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे की, तो झिम्बाब्वेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकेल. मात्र, यासाठी त्यांना मंडळाची परवानगी घ्यावी लागते.

आयसीसीने सांगितले की, कैय्याच्या गोलंदाजी शैलीचा आढावा घेण्यासाठी एक तज्ञ पॅनल तयार करण्यात आले आहे. या पॅनलने तपासानंतर निर्णय दिला की, गोलंदाजी करताना त्याचा कोपरा अंदाजे १५ अंशापेक्षा जास्त वाकलेला होता आणि शैली बेकायदेशीर होती. म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली.

मात्र, आयसीसीच्या नियमानुसार त्याच्या गोलंदाजी शैलीच्या पुनरावलोकनासाठी अर्ज करू शकतो. यानंतर, त्याची गोलंदाजी शैली पुन्हा तपासली जाईल आणि त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकतो की नाही, हे ठरवले जाईल.

यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध हरारे या २९ वर्षीय खेळाडूने कसोटीत पदार्पण केले. त्याने पहिल्या सामन्यात ४८ धावा केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तो झिम्बाब्वेसाठी २०१५ मध्ये फक्त एक एकदिवसीय सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला या स्वरूपात खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्याने आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याला एक देखील विकेट घेता आलेली नाही. कैय्याने ६४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या ऑफ स्पिनरने लिस्ट-ए च्या ६६ सामन्यात ६१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने २७ टी -२० मध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

त्यावेळी जो रूटने ‘असे’ करायला नको होते, संघसहकारी अँडरसननेच दाखवून दिली मोठी चूक

तुम्ही स्लेजिंगवर लक्ष केंद्रित करत आहात का? अजिंक्य रहाणेने दिले ‘असे’ उत्तर

क्रिकेटवर कोरोनाची पुन्हा वक्रदृष्टी! न्यूझीलंडच्या धडाकेबाज सलामीवीराचा अहवाल आला पॉझिटिव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---