---Advertisement---

कथा ख्रिस्तियानो रोनाल्डोला रोखणाऱ्या गोलकीपरची

On: शनिवार, जून 30, 2018 4:03 PM
---Advertisement---

फिफा विश्वचषकात गट फेरीतच इराणचे आव्हान संपले आहे. बलाढ्य अशा बी गटात पोर्तूगाल, स्पेन, मोरक्को आणि इराण यांचा समावेश होता.

गट फेरीच्या एका सामन्यात विजय, एक सामना बरोबरीत आणि एका सामन्यात पराभव झालेल्या इराणला विश्वचषकाच्या गट फेरीतूनच बाहेर पडावे लागले.

मात्र स्पर्धेतून बाहेर जाता जाता इराणचा २५ वर्षीय युवा गोलकीपर फुटबॉल जगतावर आपली छाप सोडून गेला. या इराणच्या गोलकीपरचे नाव आहे अलिरेझा बिरनवांड.

इराणमधील भटक्या जमातीमधील असलेल्या अलिरेझा बिरनवांडने फिफा विश्वचषकात आपल्या कामगिरीने फुटबॉलमधील दिग्गजांकडून वाहवा मिळवली.

या  अलिरेझा बिरनवांडचा मेंढपाळ ते फिफा विश्वचषक २०१८ च्या इराण संघाचा सदस्य हा प्रवास अविश्वसनीय आहे.

लहानपणी मेंढरे पाळता पाळता अलिरेझाने आपली फुटबॉलची आवड जोपासली. इराणच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी काही दिवसातच या पठ्याने घरातून पळून जावून तेहरान गाठले.

या मेंढपाळ ते इराण फुटबॉल संघाचा प्रवास खुद्द अलिरेझा बिरनवांडने पत्रकारांसमोर मांडला.

अलिरेझा बिरनवांडने या खडतर प्रवासाबद्दल बोलताना या प्रवासातील जुन्या आठवणींना  उजाळा दिला.

“मी ज्यावेळी घरातून तेहरानला पळून आलो ती रात्र एका फुटबॉल क्लबच्या बाहेर झोपून काढली. सकाळी जेव्हा उठलो त्यावेळी लोकांनी मला भिकारी समजून माझ्या आंगावर पैसे टाकल्याचे दिसले. त्या पैशाने मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाष्टा मी त्या सकाळी खाल्ला.” असे इराणी गोलकीपर अलिरेझा म्हणाला.

अलिरेझा बिरनवांडचे इराण संघात समावेश होइपर्यंत स्ट्रगल चालूच होते. या काळात त्याने रोजी रोटीसाठी कपड्यांच्या कारखान्यात आणि पिझ्झा शॉपमध्ये देखिल काम केले आहे.

इराणमधील पर्सपोलीस फुटबॉल क्लबकडून खेळताना त्याने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावीत केले होते. या कामगिरीच्या जीवावर त्याने पुढे इराणच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

२०१८  च्या विश्वचषक स्पर्धेत गट फेरीत सर्वोत्तम गोलकीपींग करत फुटबॉल विश्वातील दिग्गजांना प्रभावीत केले होते.

इतकेच नव्हे तर पोर्तूगाल विरुद्धच्या सामन्यात अलिरेझा ख्रिस्तियानो रोनाल्डोची पेनाल्टी सेव्ह करत इराणला हा सामना बरोबरीत सोडव्यात मोलाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना

फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment