---Advertisement---

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 8:58 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान आगामी 4 कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध व इंग्लंडने श्रीलंका विरुद्ध विजय मिळवलेला असल्याने दोन्ही संघांचा आतमविश्वास वाढलेला आहे. भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर आपल्या घरी परतले आहेत. अशातच बातमी समोर येत आहे की इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेले भारतीय संघातील सर्व खेळाडू 27 जानेवारीला चेन्नई येथे पोहोचणार आहेत.

तसेच चेन्नई येथे पोहटल्यानंतर सक्तीने त्यांची कोरोणा चाचणी होणार आहे. भारत- इंग्लंड मालिका बायोबबलमध्ये पार पडणार असल्याने खेळाडूंना कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. 27 तारखेला कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना हॉटेलमध्ये जाण्यास परवानगी मिळणार आहे. इंग्लंड संघातील खेळाडू देखील 27 जानेवारीलाच चेन्नई येथे पोहोचणार आहेत. चेन्नई येथेच त्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.

तसेच चेन्नईला पोहचल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि सपोर्टस्टाफला बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर 7 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.

इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.

भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---