ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी काळात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड दौरा 22 फेब्रुवारीपासून सुरु होईल. या दौऱ्यात 5 टी20 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांचे संघ जाहीर केले आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. तरी हा दौरा मार्चमध्ये होण्याची शक्यता असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला जाणारा कसोटी संघ आणि न्यूझीलंडला जाणारा टी20 संघ पूर्णपणे वेगळा निवडला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार ऍरॉन फिंच करेल. तर उपकर्णधार मॅथ्यू वेड असेल. त्यामुळे वेडला कसोटी संघातील जागा मात्र गमवावी लागली आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऍलेक्स कॅरीची कसोटी संघात निवड झाली आहे.
तसेच न्यूझीलंडला जाणाऱ्या 18 जणांच्या टी20 संघात युवा तन्वीर संगाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच झे रिचर्डसन आणि मिशेल मार्शचे पुनरागमन झाले आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसंघातील नियमित खेळाडू ग्लेन मॅक्सवेल, ऍडम झम्पा, मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन एगार असे काही अनुभवी खेळाडूंचाही न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात समावेश आहे.
Australia name 18-man squad for the upcoming T20I series against New Zealand. pic.twitter.com/WNjHc87z5K
— ICC (@ICC) January 27, 2021
कसोटी कर्णधार म्हणून टीम पेन कायम –
भारताविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका पराभूत झाल्यानंतर टीम पेनला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याबद्दल मागणी होत होती. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनवरील विश्वास कायम दाखवत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे.
तसेच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिन्स सांभाळेल. या संघात वेगवान गोलंदाज मार्क स्टेकेटीला देखील संधी मिळाली आहे. तसेच कसोटी संघातील नियमित खेळाडू मार्नस लॅब्यूशेन, डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, नॅथन लायन हे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघातही कायम आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
ऍरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड (उपकर्णधार), ऍश्टन अगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकर्डमॉट, रिले मेरिडथ, जोश फिलिप, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम, तन्वीर संगा, डॉर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन टर्नर, अँड्र्यू टाय, ऍडम झम्पा.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), सीन ऍबॉट, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लॅब्यूशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोस्की, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क स्टेकेटी, मिचेल स्वीप्सन, डेव्हिड वॉर्नर.
महत्त्वाच्या बातम्या –
सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू
भारत-इंग्लंड मालिकेला नाव दिलेले ‘ऍन्थनी डी मेलो’ आहेत तरी कोण?
भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला….






