नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकात (ICC Women’s T20 World Cup) भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. भारत टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. पण भारताच्या या खराब कामगिरीनंतर संघाची कर्णधार ‘हरमनप्रीत कौर’कडून (Harmanpreet Kaur) कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, बीसीसीआयने हरमनप्रीतवर विश्वास ठेवला आहे. भारताला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.
भारताच्या खराब कामगिरीनंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) संघाच्या कर्णधारपदावरून हटवावे, असे म्हटले होते. मात्र, भारतीय नियामक मंडळाने (BCCI) हरमनप्रीतवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आगामी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलथा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर. तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील
A look at #TeamIndia’s squad for the three-match ODI series against New Zealand 👌👌 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pKxdLCWsnb
— BCCI Women (@BCCIWomen) October 17, 2024
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक-
24 ऑक्टोबर 2024- गुरुवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
27 ऑक्टोबर 2024- रविवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
29 ऑक्टोबर 2024- मंगळवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; 46 धावात सर्वबाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आमचा निर्णय चुकीचा…”
IND vs NZ; 91 वर्षांनंतर भारताच्या नावावर झाला ‘हा’ खराब रेकाॅर्ड
IPL 2025; आगामी हंगामापूर्वीच गांगुलीला मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ भूमिकेत दिसणार