भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी (22 नोव्हेंबर) रोजी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. या मालिकेच्या इतिहासात अनेक मोठे रेकाॅर्ड झाले. काही तुटले, तर काही रेकाॅर्ड्स आजही कायम आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारतीय संघाचे बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या इतिहासातील मोठे रेकाॅर्ड्स जाणून घेऊया.
गेल्या 8 वर्षांपासून ही ट्रॉफी भारताच्या ताब्यात आहे, पण ऑस्ट्रेलियाची भीती आजही कमी नाही. यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात नवीन खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले. ऑस्ट्रेलियात नाव कमवायचे असेल तर या खेळाडूंना विक्रमी खेळी करावी लागणार आहे.
1) धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय-1977 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला मेलबर्नच्या मैदानावर यजमानांचा 222 धावांनी पराभव करून इतिहास रचला होता.
2) विकेटच्या फरकाने सर्वात मोठा विजय- 2020 साली मेलबर्नमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव करून हा रेकाॅर्ड केला होता.
3) सर्वाधिक धावा- बॉर्डर गावसकर मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 20 कसोटी सामन्यात 1,809 धावा केल्या आहेत, हा रेकाॅर्ड वर्षानुवर्षे कायम राहिला आहे.
4) एका डावात सर्वोच्च धावसंख्या- एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्डही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकर जानेवारी 2004 मध्ये 436 चेंडूत 241 धावांवर नाबाद राहिला होता.
5) सर्वाधिक शतके- ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकांचा रेकाॅर्ड विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. या दोन्ही दिग्गजांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 6-6 शतके झळकावली आहेत.
6) सर्वाधिक वेळा शून्यावर बाद- ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकाॅर्ड भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) नावावर आहे. तो 23 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
7) सर्वाधिक षटकार- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 14 डावात 10 षटकार मारले आहेत. पण एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) नावावर आहे. त्याने 2003 मध्ये 195 धावांच्या खेळीत 5 षटकार ठोकून हा रेकाॅर्ड केला होता.
8) मालिकेत सर्वाधिक धावा- एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. कोहलीने 2014-15 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 8 डावात 692 धावा केल्या होत्या.
9) हेड टू हेड रेकाॅर्ड- भारताने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियात एकूण 52 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 30 सामने गमावले आहेत. या यादीत 13 सामने ड्रॉही झाले आहेत.
10) सर्वोच्च धावसंख्या- 2004 साली भारताने सिडनीमध्ये इतिहास रचला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नाबाद 241 धावा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 178 धावांच्या जोरावर भारताने 7 गडी गमावून 705 धावा करून पहिला डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियातील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
11) डावाच्या फरकाने सर्वात मोठा विजय- ऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात मोठा विजयाचा रेकाॅर्ड गेल्या 44 वर्षांपासून कायम राहिला आहे. भारताने 1978 साली सिडनी येथे कांगारू संघाचा एक डाव राखून आणि 2 धावांनी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट..! कधी करणार पुनरागमन?
BGT; विराट कोहलीला OUT कसे करायचे? ऑस्ट्रेलिया दिग्गजाने सांगितला प्लॅन!
IND vs AUS: विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा, माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी