Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सेना’ देशांत टीम इंडियाचे तीन वर्षांपासून पानिपत!

January 24, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Team India

Photo Courtesy: Twitter/ICC


दक्षिण अफ्रिका (south africa) आणि भारत (india) यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा (sa vs ind odi series) तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (२३ जानेवारी) पार पडला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करला. दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात चार धावांनी विजय मिळवला. दरम्यान सेना (SENA) देशांतील (दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड) ही सलग तिसरी एकदिवसीय मालिका आहे, ज्यामध्ये भारतीय संघ अपयशी ठरला आहे.

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील ही एकदिवसीय मालिका तीन सामन्यांची होती. भारताला मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना १९ जानेवारीला खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघ ३१ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना २१ जानेवारीला खेळला गेला आणि यामध्येही दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्सने विजय मिळवला. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात देखील दक्षिण अफ्रिकेने भारताला धूळ चारली आहे. सेना देशांतील भारताचे मागच्या काही वर्षांतील एकदिवसीय प्रदर्शन पाहता, ते निराशाजनक राहिले आहे.

भारतीय संघाने सेना देशांमध्ये खेळलेल्या मागच्या तीन एकदिवसीय मालिकांचा विचार केला, तर यामध्ये भारताचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. भारताने २०१९-२० मध्ये न्यूझीलंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव मिळाला होता. त्यानंतर २०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्याठिकाणी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता यावर्षी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात देखील परिस्थिती काही सुधारली नाही. दक्षिण अफ्रिकने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा ०-३ असा पराभव केला आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून  प्रथम गोलंदाजी करणाच्या निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने दक्षिण अफ्रिकेनेला २८७ धावांच्या मर्यादित धावसंख्येवर रोखले. दक्षिण अफ्रिका संघ ४९.५ षटकात सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४९.२ षटकात २८३ धावा केल्या आणि शेवटची  परिणामी दक्षिण अफ्रिकेने चार धावांनी सामन्यात विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ प्रश्नावर मिताली राजचा सुटला संयम; पत्रकारांवर आगपाखड करत म्हणाली…

बेंगलोर बुल्स ‘टॉप’वर! तेलगू टायटन्सच्या पदरी पुन्हा निराशा

एक शतकी खेळी आणि विक्रमांची रांग! डी कॉकने सोडले रथी-महारथींना मागे

व्हिडिओ पाहा –


ADVERTISEMENT
Next Post
kl-dravid

कर्णधार राहुलने ओढली प्रशिक्षक राहुलची री! पाहा हे लाजिरवाणे आकडे

de-kock 100

लाजवाब शतकासह डी कॉकची भरारी! आता खुणावतोय संगकाराचा 'तो' विश्वविक्रम

kohli-shastri

शास्त्री गुरूजी म्हणतायेत,"विराट आणखी दोन वर्षे नेतृत्व करू शकला असता"

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.