---Advertisement---

मुंबई-गुजरात एलिमिनेटर सामना पावसात वाहून गेला, तर ‘हा’ संघ होणार बाहेर

On: गुरूवार, मे 29, 2025 8:24 PM
---Advertisement---

MI vs GT Eliminator Match: यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2025) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स, या दोन्ही संघांनी यापूर्वी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण आता एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. (MI vs GT Eliminator) गुजरात आणि मुंबई यांच्यातील एलिमिनेटर सामना (30 मे) रोजी मुल्लानपूरच्या मैदानावर खेळला जाईल. पण आयपीएलचे प्लेऑफ सामन्यांचे नियम देखील खास असतात. गुजरात-मुंबई एलिमिनेटर सामना पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द घोषित झाल्यास कोणता संघ बाहेर होईल? चला तर मग जाणून घेऊया.

एलिमिनेटर सामन्याच्या दिवशी मुल्लानपूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, जोरदार वारे वाहू शकतात आणि तापमानही सामान्यपेक्षा कमी राहू शकते. अशा परिस्थितीत, जर एलिमिनेटर सामन्यादरम्यान पाऊस आला आणि सामना रद्द झाला, तर मुंबई इंडियन्स एलिमिनेटर न खेळताच बाहेर पडेल. आयपीएलच्या नियमानुसार, जर एलिमिनेटर सामना रद्द झाला, तर गुणतालिकेत पुढे असलेल्या संघाला पुढील टप्प्यासाठी (क्वालिफायर 2) पात्र मानले जाते.

गुणतालिकेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सने अनुक्रमे 18 आणि 16 गुण मिळवले होते. त्यामुळे, जर एलिमिनेटर सामना रद्द झाला, तर अधिक गुणांच्या आधारावर गुजरात टायटन्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल. एलिमिनेटर सामन्यात जिंकणारा संघ क्वालिफायर 1 मध्ये हरलेल्या संघाशी सामना करतो. (Mumbai and Gujarat will face off in the eliminator match)

आयपीएलच्या या नियमावर खूप टीका झाली आहे की एलिमिनेटर सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आलेला नाही. आयपीएल 2025 मध्ये केवळ दुसऱ्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. गुजरातने एकदा आणि मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्राॅफीवर आपले नाव कोरले आहे. जर (30 मे) रोजी पाऊस आला, तर या नियमाचा फटका मुंबई इंडियन्सला बसू शकतो. (There is no reserve day for the Eliminator match)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---