गुरुवारी (२२ एप्रिल ) पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात विराट कोहलीचे अर्धशतक आणि देवदत्त पडीक्कलच्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १० गडी राखून विजय मिळवत आयपीएल २०२१ स्पर्धेतील सलग चौथा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात खेळाडू वृत्तीचे उदाहरण पाहायला मिळाले होते.
क्रिकेटला ‘जेंटलमन्स गेम’ म्हणून ओळखले जाते. याचा नमुना खेळाडू मैदानावर नेहमी देत असतात. असच काहीतरी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. देवदत्त पडीक्कलने या सामन्यात शतक झळकावले होते. यापूर्वी जोस बटलरने सर्वांचे मन जिंकले होते.
फलंदाजी करत असलेल्या देवदत्त पडीक्कलच्या बुटांची लेस सुटली होती. ती लेस बांधण्यासाठी क्षेत्ररक्षण करत असलेल्या जोस बटलरने धाव घेतली होती. हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
#SpiritofCricket ????
Jos Buttler ???? Devdutt Padikkal#VIVOIPL pic.twitter.com/5dDsXeJPiM
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या सामन्यात शिवम दुबेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली होती. तर राहुल तेवतियाने ४० धावांचे योगदान दिले होते. तसेच रियान परागने देखील २५ धावांचा हातभार लावला होता. २० षटक अखेर राजस्थान रॉयल्स संघाने ९ बाद १७७ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सामना एकतर्फी करत, १० गडी राखून विजय मिळवला. पडीक्कलने आपले पाहिले शतक झळकावत नाबाद १०१ धावा केल्या, तर कर्णधार विराट कोहलीने देखील नाबाद ७२ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
संघ-सहकाऱ्यासोबत धावांचे दीडशतक पार करण्यात कोहली माहीर, कोणालाही न जमलेल्या किर्तीमानाची केली नोंद
शतकाजवळ पोहोचल्यानंतर पडीक्कलने कोहलीला म्हटले होते असे काही, वाचून करालं कौतुक
बाबा नंबर १! अर्धशतक झळकावल्यानंतर विराटचं मन जिंकणारं सेलिब्रेशन, लाडक्या लेकीला केलं समर्पित




