सध्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) दिल्ली आणि रेल्वे (Delhi vs Railways) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) खेळत आहे. खरेतर, विराट बऱ्याच काळानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आहे, पण रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला किती फी मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) देशांतर्गत वेतन रचनेनुसार, 20-40 रणजी ट्रॉफी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना दररोज 50,000 रुपये मिळतात. आतापर्यंत विराट कोहलीने (Virat Kohli) रणजी ट्रॉफीच्या 23 सामन्यात 1,547 धावा केल्या आहेत. याचा अर्थ असा की विराट या सामन्यातून 50,000 रूपये कमवेल.
खरे तर, ही रक्कम विराटला दरवर्षी किंवा भारतासाठी A+ ग्रेड खेळाडू म्हणून मिळणाऱ्या प्रत्येक कसोटी सामन्यापेक्षा खूपच कमी आहे. त्याला A+ ग्रेड खेळाडू म्हणून दरवर्षी 7 कोटी रुपये किंवा प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये करार मिळतो.
दिल्ली विरुद्ध रेल्वे (Delhi vs Railways) सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला रेल्वे संघ 241 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत दिल्लीने 1 विकेटच्या मोबदल्यात 41 धावा केल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“खेळापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी…” माजी दिग्गजाची भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा
AUS vs SL; मिचेल स्टार्कने रचला इतिहास, 700 विकेट्स पूर्ण करत केला खास रेकाॅर्ड
चौथ्या टी20 सामन्यासाठी स्टार फलंदाजाचे पुनरागमन, जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग 11






