भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचा सर्वकालिन 11 जणांच्या संघाची निवड केली आहे. ज्यात त्याने आपल्या संघात भारताच्या फक्त 2 खेळाडूंना जागा दिली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या यूट्यूब चॅनेलवर गांगुलीने आपल्या सर्वकालीन 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
सौरव गांगुलीने या आपल्या संघामध्ये मॅथ्यू हेडन आणि ऍलिस्टर कूक या दोघांना सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. त्याचबरोबर संघात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान सौरव गांगुलीने राहुल द्रविडला दिले आहे. तर चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा देखील संघात समावेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त गांगुलीने आपल्या संघामध्ये जॅक कॅलिसला अष्टपैलू खेळाडूचे स्थान दिले आहे. तर संघाचा यष्टिरक्षक म्हणून गांगुलीने श्रीलंका संघाच्या कुमार संगकाराला पसंती दिली आहे.
सौरव गांगुलीच्या या संघात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग देखील आहे. सौरव गांगुलीने पॉन्टिंगला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. वेगवान गोलंदाज म्हणून गांगुलीने ग्लेन मॅकग्रा आणि डेल स्टेन यांची निवड केली आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनची देखील संघात निवड झाली आहे.
सौरभ गांगुलीने निवडलेल्या सर्वकालीन 11 खेळाडूंच्या यादीत 4 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. तर 2 खेळाडू दक्षिण आफ्रिका संघाचे आहेत, इतकेच खेळाडू भारतीय संघाचे देखील आहेत. तर श्रीलंका संघातील कुमार संगकारा आणि मुरलीधरन यांची निवड केलेली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे सौरव गांगुलीने अनिल कुंबळेची आणि कपिल देव यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंची संघात निवड केली नाही. त्याशिवाय गांगुलीच्या या संघात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानचा एकही खेळाडूला स्थान दिले गेले नाही.
सौरव गांगुलीने निवडलेला सर्वकालीन अकरा खेळाडूंचा संघ
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), ऍलिस्टेर कुक (इंग्लैंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया, कर्णधार), ग्लेन मॅकग्र (ऑस्ट्रेलिया) ), शेन वार्न (ऑस्ट्रेलिया), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकविषयी मोठा निर्णय, प्रेक्षक मुकणार जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला
ठरलं तर! आणखी ‘इतके’ वर्षे धोनी खेळणार सीएसकेकडून, सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली माहिती
‘तुझे शेजारचे आता हाय अलर्टवर असतील’, दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिग्गजाने घेतली मजा