चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोण शीर्षस्थानी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा कुठे आहे? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 सामन्यांमध्ये सौरव गांगुलीने 17 षटकार मारले. सौरव गांगुलीच्या पाठोपाठ भारतीय संघाचाअष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पंड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 9 सामन्यांमध्ये 15 षटकार मारले आहेत.
सौरव गांगुली आणि हार्दिक पांड्यानंतर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 17 सामन्यात ख्रिस गेलने 15 षटकार मारले. तर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हिड मिलरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यात 14 षटकार मारले. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 सामन्यात इऑन मॉर्गनने 14 षटकार मारले. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने 17 सामन्यात 12 षटकार मारले आहेत. त्याच वेळी शेन वॉटसननंतर इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूड हा क्रमांक लागतो. पॉस कॉलिंगवूडने 11 चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात 11 षटकार मारले आहेत
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 14 सामन्यांमध्ये 11 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा षटकार मारण्याच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर असेल, परंतु या स्पर्धेत रोहित शर्माची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 14 सामन्यांमध्ये 45.00 च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत रोहित शर्माचा सर्वाधिक धावा 123 धावा आहेत. रोहित शर्मानंतर, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 सामन्यांमध्ये 10 षटकार मारले. या यादीत न्यूझीलंडचा क्रेग मॅकमिलन दहाव्या क्रमांकावर आहे. क्रेग मॅकमिलनने 7 चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांमध्ये 9 षटकार मारले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
इरफान पठाणचा सल्ला: अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या ‘या’ दोन खेळाडूंवर खास लक्ष द्या!
IND vs NZ Final: “25 वर्षांनंतर पुन्हा जिंकायला आवडेल” फायनलपूर्वी स्टार खेळाडूची मोठी प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये न्यूझीलंडचा खेळ खल्लास! भारताचे 3 गुप्त अस्त्र करणार कमाल