---Advertisement---

पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’

MS-Dhoni-and-Nicholas-Pooran
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याची लोकप्रियता केवळ भारताच नाही, तर जगभरात आहे. त्याचे चाहते केवळ सामान्य लोकच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटूही आहेत. अनेकदा आजी-माजी क्रिकेटपटू धोनीचे कौतुक करताना दिसतात. तसेच युवा खेळाडूही त्याला आदर्श मानतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नुकतेच वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याने धोनीच्या लोकप्रियतेबद्दल कौतुक केले आहे. 

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम (आयपीएल) सुरू आहे. या हंगामात ४६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings) संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे (MCA Stadium, Pune) येथे रविवारी (१ मे) पार पडला. या सामन्यानंतर पूरन (Nicholas Pooran) आणि धोनी यांची भेट झाली होती. पूरन आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत आहे. तसेच धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.

या सामन्यानंतर झालेल्या धोनीबरोबरच्या भेटीदरम्यानचा फोटो निकोलस पूरनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘जेव्हा हा व्यक्ती स्टेडियममध्ये असतो तेव्हा सर्वत्र उर्जा असते. त्याच्यासाठी असलेले प्रेम अविश्वसनीय आहे. पुणे त्याच्यासाठी अगदी दिवाने झाले होते. नक्कीच माझ्या कारकिर्दीतील ही एक अशी आठवण आहे, जी कायम स्मरणात राहिल.’

https://www.instagram.com/p/CdE8h1Xo-DC/

खंरतर आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी धोनीने १२ वर्षे चेन्नईचे नेतृत्व केल्यानंतर कर्णधारपद सोडले होते. ही जबाबदारी त्याच्यानंतर चेन्नईने रविंद्र जडेजाच्या खांद्यावर टाकली होती आणि धोनी या आयपीएल हंगामात केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत होता. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी चांगली झाली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्यामुळे जडेजाने ८ सामन्यांनंतर वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा धोनीकडे सोपवण्यात आले आणि रविवारी धोनी हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. त्याला पुन्हा कर्णधार झाल्याचे पाहून स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता.

https://twitter.com/IPL/status/1520762355483049985

दरम्यान, हा सामना चेन्नईने १३ धावांनी जिंकला. चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या ९९ धावा आणि डेवॉन कॉनवेच्या नाबाद ८५ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात २ बाद २०२ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून टी नटराजनने २ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून निकोलस पूरनने ३३ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या होत्या. तसेच कर्णधार केन विलियम्सनने ४७ धावांचे आणि अभिषेक शर्माने ३९ धावांचे योगदान दिले होते. पण हैदराबादला २० षटकांअखेर ६ बाद १८९ धावाच करता आल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

स्वत:ला दिलेल्या वचनाला जागला रिंकू सिंग; सामन्यापूर्वी हातावर लिहिली होती प्रेरणा देणारी ‘ही’ गोष्ट

‘फाफ आता माझ्यावर जळत असेल’, एकेकाळी डावाची सुरुवात करणाऱ्या सहकाऱ्याबद्दल असं का म्हणाला ऋतुराज?

IPL 2022 | असे ३ खेळाडू ज्यांना आयपीएल फ्रँचायझींनी केले होते रिटेन, पण विश्वासास ठरले अपात्र

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---