बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नीना गुप्ताची ओळख आहे. नीनाने तिच्या कामगिरीने सर्वांच्या मनावर राज्य केले. परंतु ती अनेकदा तिच्या कामगिरीपेक्षाही अधिक तिच्या आणि विवियन रिचर्ड्समधील अफेयरमुळे चर्चेत असते. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचे अफेअर कधी सुरू झाले आणि कसे हा सर्वांना प्रश्न पडला होता. खूप वर्षानंतर नीना गुप्ताने आपल्या या अफेयरबद्दल काही गुपितं सर्वांसमोर उघडली आहेत. तिने आपल्या आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ मध्ये विवियन रिचर्ड्स सोबतच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे सांगितला आहे.
आत्मचरित्रामध्ये नीना गुप्ताने आपल्याबद्दल सांगितले आहे की, जेव्हा ती रिचर्ड्सच्या प्रेमात पडली तेव्हा तिच्या अगोदरचा जोडीदाराने लग्नाच्या वेळेस माघार घेतली होती. याचे कारण नीनाला आजपर्यंत माहित नाही. त्याचबरोबर नीना गुप्ताने लिहिले की, तिला लहानपणापासून क्रिकेट खूप आवडत होते.
पुढे सांगितले की, कॉलेजच्या दिवसांमध्ये जर सामना चालू असेल तर ती कानामध्ये ट्रांजिस्टर लावून ठेवत होती आणि त्याच्यावर ती स्कार्फ झाकत होती. सर्वात चांगली गोष्ट ही होती की, सामने फक्त थंडीच्या दिवसातच होत असत. त्यामुळे कुणाला शंकाही येत नसे. खरंतर, विवियन रिचर्ड्सशी पहिल्या भेटी अगोदरच, नीना गुप्ताला माहित होते की, रिचर्ड्स एक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. तेव्हा नीना गुप्ता मुंबईमध्ये चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
नीना गुप्ताने विवियन रीचर्डस आणि तिच्या पहिल्या भेटीबद्दल लिहिले की, ‘बटवारा’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. एके दिवशी युनिटची संपूर्ण स्टारकास्ट जयपुरच्या महाराणीकडे एका पार्टीत गेली होती. त्याच दरम्यान पाहुण्यांच्या यादीमध्ये वेस्ट इंडीजचे तत्कालीन कर्णधार विवियन रिचर्ड्स आणि त्याच्या संघातील अनेक खेळाडूंचा समावेश होता.
परंतु रिचर्ड्सला भेटण्याचे आणि त्यांच्याशी बोलण्याचे कारण काय होते, याविषयी नीना गुप्ताने पहिल्यांदाच याबाबतची रहस्ये उघडली आहेत.
नीनाने लिहिले की, “पार्टीच्या एक दिवस अगोदर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना होता. तो सामना मी पाहिला होता. भारताने हा सामना एक किंवा दोन धावांनी हरला. जेव्हा वेस्टइंडीज संघ विजयी झाला, तेव्हा संघातील इतर खेळाडू मैदानात उत्सव साजरा करीत होते. तेव्हा माझे लक्ष रिचर्ड्सकडे गेले. त्याच्या वागण्यात मोठेपणा दिसत होता. माझ्या खूप चांगले लक्षात आहे की, मी त्याच्या डोळ्यात अश्रू पाहीले होते, त्याला कदाचित या गोष्टीची जाणीव होत असेल की, तो सामना आपण गमावू शकतो असतो.” त्यावेळी नीना गुप्ताने विवियन रिचर्ड्सबद्दल विचार केला, “तो किती चांगला माणूस आहे की, जो थेट टीव्हीवरही आपल्या भावना व्यक्त करण्यास घाबरत नाही.”
रिचर्ड्सच्या या स्वभावामुळे ती खूप प्रभावित झाली आणि दुसर्याच दिवशी पार्टीत तिची त्यांच्याशी भेट झाली. विवियन रिचर्ड्सबरोबर झालेल्या या भेटीत नीना गुप्तानी लिहिले की, “मी त्याच्याशी हात मिळवला आणि त्याला सांगितले की, तुमच्या आवडत्या छंदाचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे.” यानंतर दोघांमध्ये बोलणे झाले आणि दोघांनीही एकमेकांना भेटत राहू असे सांगितले.
एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ आपल्या सुवर्ण काळाच्या शेवटच्या दिवसांत होता. परंतु विवियन रिचर्ड्स एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत होता. तो अस्खलित इंग्रजी बोलत होता आणि तो एक स्टाईलिश क्रिकेटपटू होता. सुनील गावस्कर यांनी आपल्या ‘आयडॉल’ या पुस्तकात त्या काळातील रिचर्ड्सच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक विशेष गोष्ट लिहिली की, “विवला चांगले कपडे घालायला खूप आवडतात, त्याच्याकडे एक छानसे वॉर्डरोब असेल. जर मी चूकीचा नसेल तर त्याने काउन्टी हंगामात एक टी-शर्ट दोनदा कधीच घातलेला नाही आणि नेहमी चांगल्या कपड्यांमध्ये दिसून येत असत.”
नीना गुप्ता ज्या क्रिकेट सामन्याबद्दल बोलत होती तो सामना नागपूरमध्ये 7 जानेवारी 1988 मध्ये खेळला गेला होता. हा तोच एक दिवसीय सामना होता, ज्यामध्ये भारतीय संघ 2 धावांनी हा पराभूत झाला होता. वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करत 48.3 षटकांमध्ये 196 धावा बनवल्या होत्या. या सामन्यामध्ये कर्णधार रिचर्डस्ने फक्त 17 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देत श्रीकांतच्या शानदार 53 धावांमुळे भारत विजयाच्या जवळ आला होता. पण याच सामन्यात रिचर्ड्सने गोलंदाजी करत श्रीकांतची अतिशय महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
या सामन्यानंतर आणि पार्टीनंतर वेस्ट इंडिजचा संघ पुढील तीन-चार आठवडे भारतामध्ये सामने खेळत होता. त्यानंतर वेस्ट इंडिज संघ आपल्या मायदेशी परतणार होता.
नीना गुप्ताने लिहिले की, “जेव्हा रिचर्ड्स अँटिगा येथील आपल्या घरी परत गेले. तेव्हा आमचा संपर्क होऊ शकलो नाही. मला त्याची कमतरता जाणवत होती आणि मी त्याचा विचार करत होते. पण आम्ही आमचे नंबर एकमेकांना दिले नाहीत म्हणून आम्हाला कळत नव्हते की आम्ही एकमेकांसोबत कसा संपर्क करायचा. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो आणि ते त्याच्या सामन्यात. म्हणून आम्हाला नीट बसून बोलताही येत नव्हते.” रिचर्ड्सबरोबर पुन्हा भेट होईल की नाही याबद्दल नीना गुप्ताला काहीही सांगता येत नव्हते. पण ते म्हणतात ना, जर एखादी घटना घडायची असेल तर मार्ग निर्माण होतो. असेच काहीसे नीना गुप्ताच्या बाबतीत घडले.
नीनाने पुस्तकात लिहिले की, “मी दिल्ली विमानतळावर बसून माझ्या विमानाची वाट बघत होते. मी विवियनबद्दल विसरून गेले होते. अचानक तेथे मरुन रंग चमकला, मी पाहिले तर वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंना लाँजमध्ये येताना पाहिले, माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. विवियनसुद्धा तिथेच होता. मग आम्ही भेटलो आणि आमचं प्रेमसंबंध सुरू झाले, हे असे प्रेम जे इतिहासात जमा झाला आहे.” या टप्प्यावर येऊन नीना गुप्ता तिच्या आत्मचरित्राला विराम देते आणि वाचकांना सांगतात की, या प्रेमाबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे, म्हणूनच माझ्या शांततेचा आदर करा. कारण मला पुन्हा त्या परिस्थिती लिहायच्या नाहीत. यामुळे मी आणि माझी मुलगी पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत येऊ.
विवियन रिचर्ड्स यांचे 1980 मध्ये त्याने आपली मैत्रीण मरियमशी लग्न झाले होते, त्यांना २ मुलेही आहेत. विवियन रिचर्ड्सने अडचणीचा उल्लेख ‘सर विवियन: द डेफिनिटीव्ह ऑटोबोग्राफी’ या मध्ये केला आहे. त्यांनी लिहिले की, “सतत घराबाहेर पडल्यामुळे मरीयमशी माझे संबंध खराब होऊ लागले. यादरम्यान मी जयपूरच्या महाराजा पॅलेस येथे पार्टीमध्ये माझ्या आयुष्यातील दुसरी महिला नीनाला मी भेटलो.”
विवियन रिचर्ड्सच्या प्रेमसंबंधादरम्यान नीना गर्भवती राहिल्याचे सांगितले आणि गर्भधारणा झाल्याचे विवियन रिचर्ड्सला समजेपर्यंत तो अँटीगाला परत गेला होता. अशा परिस्थितीत नीना गुप्ताने तिचे संपूर्ण आयुष्य समोर उभे होते. अनेक लोकांनी तिला अनेक प्रकारचे सल्ले द्यायला सुरूवात केली. पण नीनाने ठरवले की, ती गर्भपात करणार नाही.
नीनाने ठरवले की, ती विवियनला फोन करून सगळं सांगेन. एके दिवशी तिने विवियन रिचर्ड्सना फोन केला. नीना गुप्तानी या फोन कॉलबद्दल लिहिले की, “मी म्हणाले की मी गर्भवती आहे आणि जर मी गर्भपात केला नाही तर तुला काही त्रास होणार नाही ना.”
नीनाने लिहिले आहे की, ही बातमी ऐकून विवियन रिचर्डस खूप आनंद झाला आणि त्याने माझ्या निर्णयाचे समर्थन केले. त्याच्या आधाराने मला असे वाटते की मी योग्य निर्णय घेतला आहे.
त्यांची मुलगी फॅशन डिझाइनर
नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबाचा जन्म 2 नोव्हेंबर 1989 रोजी झाला. सध्या ती एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. विवियन रिचर्ड्सने ‘सर विवियन: द डेफिनिटीव्ह ऑटोबोग्राफी’ मध्ये नीना गुप्ताबद्दल लिहिले आहे, “नीना ही बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून खूप हुशार आहे. आम्ही एक संबंध निर्माण झाले आणि मला अभिमान वाटतो की मला एक मुलगी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
फिनिक्स भरारी! पहिल्या डावात केवळ १५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या संघाने तब्बल १५५ धावांनी मिळवला विजय
ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध