विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याआधी इंग्लंड संघाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मलानने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धचा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. डेव्हिड मलानने आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले आहे.
डेव्हिड मलानने 2023 च्या विश्वचषकापूर्वी चांगली कामगिरी केली होती. त्याने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले. यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धही चमकदार कामगिरी केली. याच कारणामुळे 2023 च्या विश्वचषकासाठी त्याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान डेव्हिड मलान (David Malan) याने हा आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असे संकेत दिले. तो म्हणाला, “मी सध्या खूप वेगळ्या परिस्थितीत आहे कारण मी संघातील दुसरा सर्वात जुना खेळाडू आहे. मला माहित नाही की भविष्य कसे असेल, माझी निवड असो की संघाची निवड. शनिवार हा माझा इंग्लंडसाठी शेवटचा सामना असू शकतो किंवा तो दुसऱ्या प्रवासाची सुरुवात असू शकतो. मला नेहमी या संघाचा भाग व्हायचे होते आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत खेळायचे होते. परंतु, वयानुसार तुम्हाला पुढेही पाहावे लागेल. येत्या काही दिवसांत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.”
सध्याचा विश्वचषक इंग्लंड क्रिकेट संघासाठी अतिशय वाईट गेला आहे. आतापर्यंत त्यांना केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. तो गतविजेता संघ म्हणून आला होता पण आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीतूनही बाहेर पडण्याचा धोका होता पण नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून त्यांनी आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. यावेळी अनेक खेळाडूंची कामगिरी इंग्लंडसाठी फारशी चांगली नव्हती. (The match against Pakistan may be the last match of my career England player shocking statement)
म्हत्वाच्या बातम्या
उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात? इंग्लंडने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती