येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ चे आयोजन होणार आहे. साल २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. पण यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात होण्याची शक्यता आहे, मात्र अजून यावर बीसीसीआयने काही स्पष्टीकरण दिले नाही.
तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. या सामन्यातील मुख्य बाब म्हणजे, प्रेक्षकांना हा सामना स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह पाहता येणार आहे. त्याप्रमाणे जर आयपीएल भारतात झाली तर आयपीएलचे सामने ही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह पाहता येण्याची शक्यता आहे. अशातच बीसीसीआयने स्टेडियममध्ये प्रेक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचे ठरवले आहे.
बीसीसीआयला केंद्र सरकारकडून हिरवा सिग्नल
बीसीसीआयने नागरी उड्डाण मंत्रालय यांना लाईव्ह प्रक्षेपणसाठी रिमोटली पायलेट एअरक्राफ्ट सिस्टीमसाठी निवेदन दिले होते. यानंतर केंद्र सरकारने, भारतात होणाऱ्या काही मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लाईव्ह एरियल सिनेमेटोग्राफी करिता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याची मुभा दिली आहे. परंतु केंद्र सरकारने याबाबतीत काही अटी ठेवल्या आहेत.
आयपीएलमध्ये घेता येणार एरियल व्ह्यूचा आनंद
बीसीसीआय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सर्वप्रथम आयपीएलमध्येच करणार आहे. परंतु आयपीएल या वर्षी भारतात होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नाही आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभाग घेत असतात. यामुळे आयपीएलचे आयोजन भारतात करण्याआधी बीसीसीआयला सुरक्षेबात काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच जर यंदा आयपीएलचे आयोजन भारतात झाले तर सामन्यांचा एरियल व्ह्यूचा आनंद घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
….म्हणून हरभजन सिंग सीएसकेकडून खेळला नव्हता २०२० सालचा आयपीएल हंगाम






