ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने इंडियन प्रीमियर लीगविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कमिन्सच्या मते आयपीएलमध्ये खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दबाव राहिला नाहीये. आधिप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकाधिकार राहिला नाहीये. अशात राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंची मने वळवणे मोठे आव्हान बनले आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज सध्या न्यूझीलंड क्रिकेट संघाशी कुठल्याही कराराने जोडला गेला नाहीये. अशात तो जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळू शकतो. पॅट कमिन्स (Pat Cummins) देखील बोल्डच्या या निर्णयाशी सहमद दिसला. कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ 7 जूनपासून भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. त्याआधी कमिन्सने एका माध्यमाला मुलाखत दिली.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याआधी पॅट कमिन्सा असे वाटते की, आयपीएलमुळे खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही राहिली नाहीये. कमिन्स म्हणाला, “मागच्या काही काळापासून असे वाटतच होते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे महत्व आहे. आता प्रत्यक्षात असे होत आहे. खेळाडूंच्या वेळेवर आता आधीप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे एकाधिकार राहिला नाहीये. आयपीएलने एक दशकाआधीच यात बदल केला होता. पण आता जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. अशात मला असेच वाटते की, आम्ही देखील यात सक्रिय झालो पाहिजे.”
“ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याला जेवढे महत्व देता येईल, तितके आम्ही देत आहोत. पण ही गोष्ट आता आव्हान बनत चालली आहे. आम्ही याविषयी गांभीर्याने विचार करत आहोत.” कमिन्स याचसोबत म्हणाला की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे द्विपक्षीय कसोटी मालिकांना महत्व मिळत आहे. कमिन्स यावेळी भारताविरुद्ध डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळाले. तो म्हणाला, “पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आम्हीच भारताला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. मला वाटते अनेकांना या गोष्टीचा विसर पडला आहे. डब्ल्यूटीसीमुले खेळली जाणार प्रत्येक कसोटी मालिका आता अधिक महत्वाची बनली आहे.” (The monopoly of international cricket on the players ended due to IPL! Pat Cummins reacts before the WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: MPLमध्ये 6 संघांवर रेकॉर्डब्रेक बोली! ऋतुराज पुण्याकडे, तर केदार कोल्हापूरकर; लगेच वाचा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट करणार भीमपराक्रम, विवियन रिचर्ड्स-सेहवागचा ‘हा’ विक्रम होणार उद्ध्वस्त!