पुणे, दि. 7 डिसेंबर 2022 – टेनिस प्रीमियर लीग (Tennis Premier League) स्पर्धेच्या सर्वांना प्रतीक्षा असलेल्या चौथ्या मौसमाला बुधवार, 7 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात प्रारंभ होत आहे. त्याआधी पार पडलेल्या लीगच्या शानदार उद्घाटन समारंभासाठी अभिनेत्री व पुणे जाग्वार्सची सहमालक सोनाली बेंद्रे, तसेच भारताचा स्टार टेनिसपटू व मुंबई लिऑन आर्मीचा सहमालक लिअँडर पेस यांची उपस्थिती खास आकर्षण ठरली.
या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अन्य मान्यवरांमध्ये मुंबई लिऑन आर्मीचे मालक श्याम पटेल, बंगलुरू स्पार्टन्सचे कपिल झवेरी, फाईनकॅब हैदराबाद स्ट्रायकर्सचे ब्रिजगोपाल भुतडा, पंजाब टायगर्सचे रामिंदर सिंग, दिल्ली बिन्नीज ब्रिगेडचे स्नेह पटेल, गुजरात पँथर्सचे रामकू पाटगीर, चेन्नई स्टॅलियन्सचे शैलेश अलागिया, पुणे जाग्वार्सचे पुनीत बालन हे मान्यवर उपस्थित होते. कतार येथील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उदघाटन समारंभात वादन केलेल्या एसके म्युझिक वर्क्स या वाद्यवृंदाने टेनिस प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभातही अप्रतिम वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
आज सुरू होत असलेल्या टेनिस प्रीमियर लीगच्या पहिल्या लढतीत दिल्ली बिन्नीज ब्रिगेडसमोर 4.30 वाजता पुणे जाग्वार्सचे आव्हान असणार आहे. गुजरात पँथर्स विरुद्ध मुंबई लिऑन आर्मी ही लढत 5.55 वाजता सुरू होणार असून बंगलुरू स्पार्टन्स विरुद्ध पंजाब टायगर्स ही लढत 7.20 वाजता सुरू होणार आहे. दिवसातील अखेरची लढत चेन्नई स्टॅलियन्स विरुद्ध फाईनकॅब हैदराबाद स्ट्रायकर्स यांच्यात 8.45 वाजता सुरू होणार आहे.
टेनिस प्रीमियर लीगचे सहसंस्थापक मृणाल जैन या प्रसंगी म्हणाले की, लीगच्या चौथ्या मौसमाला आज प्रांरभ होत असून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. लीगच्या पहिल्याच दिवशी आपल्याला काही अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमाला प्रचंड प्रतिसाद देऊन टेनिसशौकीन ही स्पर्धा यशस्वी करतील, असा मला विश्वास वाटतो.
टेनिस प्रीमियर लीगचे सहसंस्थापक मृणाल जैन यांनीही सहमती व्यक्त करताना सांगितले की, यंदाचा चौथा मौसम हा टेनिस प्रीमियर लीगचा सर्वात भव्य मौसम ठरेल. आज पहिल्या दिवसापासूनच टेनिसशौकीन प्रचंड संख्यने बालेवाडीतील टेेनिस संकुलात हजर राहून खेळाडूंना प्रोत्साहन देतील, अशी मला खात्री आहे. आम्हाला खरोखरीच सर्वोच्च दर्जाचे टेनिस पाहायला मिळणार आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय स्टार टेनिसपटूंचे कौशल्य पाहायला मिळणार असल्यामुळे भारतीय टेनिसशौकिनांसाठी ही सुवर्णसंधीच ठरेल. बालेवाडी येथे आज सुरू होत असलेल्या टेनिस प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी टेन2 वाहिनीवरून, तसेच सोनी लाईव्ह, ओटीटी प्लॅफॉर्मवरून सायंकाळी साडेचारपासून पाहता येणार आहे. (The much-awaited fourth season of the Tennis Premier League kicks off today)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जागतिक 17व्या क्रमांकाचा मरिन चिलीच व अव्वल 100 मधील 16 खेळाडूसह पाचवी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यात रंगणार
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत केडन्सचा पुना क्लबवर दणदणीत विजय