---Advertisement---

MI vs KKR: केकेआरचा दारुण पराभव करत IPL 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला विजय

On: सोमवार, मार्च 31, 2025 10:34 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना जिंकत मुंबईने विजयाची दार उघडली आहेत. आज म्हणजेच 31 मार्च रोजी 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. हा सामना वानखेडे स्टेडियमवर म्हणजेच घरेलु मैदानावर मुंबई संघाने जोरदार पुनरागमन करत जिंकला. मुंबईने केकेआरचा दारुण पराभव करत 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केकेआर संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. मुंबईने 12.5 षटकार हे आव्हान पूर्ण केलं.

मंबई इंडियन्स संघासाठी रोहितने 13 धावा तसेच सर्वोत्तम धावा रियान रिकल्टने धावा केल्या. त्याने 41 चेंडूत 62 धावा केल्या. जॅक्स 16 धावा तर सूर्यकुमारने 9 चेंडूत 27 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी अश्वनी कुमारने केली. त्याने तीन षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुंबईसाठी दीपक चाहरने 2 तसेच बोल्ट , पुथुर, हार्दिक सेंटनरने 1-1 विकेट्स घेतल्या.

मुंबई संघाने जोरदार पुनरागमन करत केकेआरला जोरदार गोलंदाजीने 116 धावांवर ऑल आउट केल होतं. केकेआरचा संपूर्ण संघ 16.3 षटकात ऑल आउट झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अतिशय धमाकेदार प्रदर्शन करत पुनरागमन केलेल आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---