जगभरात अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना टॅट्यू काढायची आवड आहे. मग तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असो किंवा मग इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स असो. त्यांच्या शरीरावर असणारे टॅट्यूमधून कोणती ना कोणती कहाणी दिसून येते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्याही शरीरावर टॅट्यू आहे. शरीरावर असणारे टॅट्यूमुळे फाफ डू प्लेसिस बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याच्या जीवनातील अनेक घटनांना समर्पित असे त्याचे टॅट्यू आहेत. त्याच्या हाताच्या एक चतुर्थांश भागात टॅट्यूत आहेत.
त्यानी हाताच्या कोपऱ्यावर एका टॅटू मध्ये लिहिले आहे की, ‘डाइस ए डोमिनो XVIII I MMXI’, याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेसाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची ही तारिख आहे. कोपऱ्यातील एक टॅटू एडिलेडच्या दिशेने इशारा करत आहे. जिथे त्याने आपल्या कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या लग्नाची तारीख देखील टॅट्यूमध्ये आहे. त्याच्या बरोबर वरती ‘एगेप’ टॅट्यू बनवला आहे. याचा अर्थ निस्वार्थी प्रेम असा आहे. तसेच त्याच्या हातावर त्याच्या मोठ्या मुलीचे ‘एमीली’च्या नावाचा टॅट्यू देखील आहे.
https://www.instagram.com/p/BX8QKJJFdL9/
पण अनेकांना त्याच्या डाव्या बरगडीवर फजल टॅट्यूचा अर्थ काय आहे. उर्दूमध्ये या शब्दाचा अर्थ ‘कृपा’ असा आहे. त्यामुळे देवाच्या कृपेने त्याचे जीवन बदलले असा त्या टॅटूचा अर्थ असल्याचे, अनेकांनी कयास लावला आहे.
https://www.instagram.com/p/COC5JMXnB3z/
फाफ डू प्लेसिसची कारकीर्द –
2021 आणि 2022 टी-20 विश्वचषकासाठी तो उपलब्ध असतानाही त्याला संघात निवडले गेले नव्हते. दरम्यान मागच्या काही महिन्यांपूर्वी तो आपल्या राष्ट्रीय संघासाठी पुनरागमन करणार, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. पण अद्याप याविषयी कुठलीच ठोस माहिती समोर आली नाहीये. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 69 कसोटी, 143 वनडे आणि 50 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर अनुक्रमे 4163, 5507 आणि 1528 धावांची नोंद आहे. आयपीएलमध्ये त्याने 130 सामन्यांमध्ये 4133 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जयस्वाल आणि ईशान किशनला मिळाली कसोटी कॅप, पहिल्या सामन्यात नाणेफेक वेस्ट इंडीजच्या पारड्यात
24व्या ग्रँडस्लॅमपासून नोवाक जोकोविच दोन पावलं दूर! रूसच्या रुबलेवला मात देत उपांत्य सामन्यात धडक