यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा बुधवारी (20 डिसेंबर) केली गेली. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात भारताचे प्रदर्शन समाधानकारक होते. मोहम्मद शमी याच्या गोलंदाजीमुळे संघ विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. यासाठी शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच भारतात क्रीडा क्षेत्रात दिला जाणार सर्वोच्च क्रीडा रत्न पुरस्कार सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराक शेट्टी या जोडीला मिळाला.
2023 वर्षात केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी खेळाडूंना भारत सरकारकडून हे राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार पुढच्या महिन्यात दिले जाणार आहेत. क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेळाडूंना हा पुरस्कार राष्ट्रपती भवनात दिला जाईल.
बॅडमिंटन कोर्टवर कमाल करणाऱ्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. सात्विक 23, तर चिराग 26 वर्षांचा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातया बॅडमिंटनपटूंनी पुरुष डबल्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2023 मध्ये या दोघांनी स्वीस ओपन, इंडोनेशिया ओपन, कोरिया ओपन आणि चायना मास्टर्स या स्पर्धाही जिंकल्या आहेत.
अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीसह एकूण 26 खेळाडू पात्र ठरले आहेत. या सर्वांनी सरत्या वर्षात वेगवेगळ्या खेळांमध्ये देशाचे नाव मोठे केले आहे. या सर्व खेळांमध्ये प्रशिक्षकांची भूमिका देखील महत्वाची राहिली आहे. अशात प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. यावेळी एकूण 5 प्रशिक्षक या पुरस्कारासाठी पात्र ठरले. (The National Sports Awards have been announced for who performed well in 2023)
अर्जुन पुरस्कार मिळालेले सर्व 26 खेळाडू
1. ओजस प्रवीण देवताले (नेमबाजी)
2. अदिति गोपीचंद स्वामी (नेमबाजी)
3. श्रीशंकर एम (एथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (एथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धीबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुश अग्रवाल (घोडेस्वारी)
9. दिव्यकृति सिंह (घोडेस्वारी ड्रेसेज)
10. दीक्षा डागर (गोल्फ)
11. कृष्ण बहादुर पाठक (हॉकी)
12. पुखरामबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कबड्डी)
14. रितु नेगी (कबड्डी)
15. नसरीन (खो-खो)
16. पिंकी (लॉन बॉल्स)
17. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर (शूटिंग)
18. ईशा सिंह (शूटिंग)
19. हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वैश)
20. अयहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. अंतिम (कुस्ती)
23. नाओरेम रोशिबिना देवी (वुशु)
24. शीतल देवी (पॅरा धनुर्विद्या)
25. इलूरी अजय कुमार रेड्डी (ब्लाइंड क्रिकेट)
26. प्राची यादव (पैरा कॅनोइंग)
द्रोणाचार्य पुरस्कासाठी निवडलेले पाच प्रशिक्षक
1. ललित कुमार (कुस्ती)
2. आर. बी. रमेश (बुद्धीबळ)
3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा एथलेटिक्स)
4. शिवेंद्र सिंह (हॉकी)
5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)
महत्वाच्या बातम्या –
दिग्गज खेळाडूंनी सजली पलटण! लिलावात 8 खेळाडूंना खरेदी करताच IPL 2024साठी पूर्ण झाली मुंबई इंडियन्स टीम
BBLमध्ये घोंगावलं जॉर्डन नावाचं वादळ! विस्फोटक बॅटिंग करत फक्त ‘एवढ्या’ चेंडूत झळकावली Fast Fifty, Record