भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मायदेशात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने निर्विवाद पाहायला मिळाले. लीग स्टेजच्या 9 पैकी 9 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आणि गुणतालिकेत पहिल्या क्रमांकासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताला स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे. पण त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका दिग्गजाने भारतीय संघाबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
भारताने आपला शेवटचा लीग स्टेज सामना रविवारी (12 नोव्हेंबर) नेदरलँड्स संघासोबत खेळला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने 160 धावांनी नेदरलँड्सला पराभूत केले. या सामन्यात भारताचे प्रदर्शन पाहून ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकल हसी () यांनी खेळाडूंचे कौतुक केले. हसी यांच्या मते भारताचे युवा खेळाडू होऊन केलेल्या गोष्टींचा विचार करत नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हसी यांनी भारतीय संघाबाबत खास प्रतिक्रिया दिली.
मायकल हसी म्हणाले की, “भारतीय संघ चांगल्या लयीत आहे. पूर्ण आत्मविश्वासासह ते खेळत आहेत. आता भारतीय संघ नकआऊट सामन्यात कसे प्रदर्शन करतो, हे मला पाहायचं आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संग उपांत्य सामना खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा हे अगदी 2019 विश्वचषक स्पर्धेप्रमाणे असेल. भारतीय संघ मयदेशातील दबाव अशा पद्धतीने हाताळतो, हा माला पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. मयदेशातील प्रेक्षकांसमोर खेळताना ते जिंकू सकतील का? यासाठी मी त्यांना नॉकआऊट सामन्यात खेळताना पाहू इच्छितो. तुम्ही याठिकाणी पराभूत झाला, तर थेट घरी जाणार आहात.”
हसी यांनी पुढे बोलताना भारताच्या युवा खेळाडूंचे कौतुक केले. त्यांच्या मते युवा खेळाडू भूतकाळाचा विचार कमी करतात आणि वर्तमानात खेळताता. “माझ्या मते नव्या पिढीतील भारतीय क्रिकेटपटू भूतकाळाचा विचार करत नाहीत. ते आपले भविष्य स्वतः लिहित आहेत. ही नवी पिढी जुणे ओझे किंवा जुण्या जखमांच्या विचारात राहत नाहीत. त्यातून पुढे जात ते स्वतःचे भविष्य तयार करत आहेत,” असे हसी पुढे म्हणाले.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (16 नोव्हेंबर) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. (The new generation of the Indian team does not think of the past? A big statement from the Australian legend ahead of the semi-final)
महत्वाच्या बातम्या –
नाव मोठे दर्शन छोटे! ही आहे वर्ल्डकपमधील ‘फ्लॉप 11’, भारतीय संघातील…
19व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेद शेटे याला विजेतेपद