भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका मंगळवारी(19 जानेवारी) पार पडली. या मालिकेतील चौथा कसोटी सामना गाबा येथे खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने 3 विकेट्सने जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचबरोबर या मालिकेत 2-1 अशा फरकाने भारताने मालिका जिंकली. त्यामुळे तिसर्यांदा असे घडले की, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी घेऊन पराभूत झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आतापर्यंत तीन वेळा असे झाले आहे की, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतरही ऑस्ट्रेलिया संघाचा त्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या दृष्टीने 33 हा आकडा अशुभ ठरत आहे. मात्र, भारतीय संघासाठी हा आकडा शुभ ठरला आहे. कारण तीनवेळा असे घडले आहे की, भारतीय संघाने पहिल्या डावात 33 धावांची पिछाडी स्वीकारुन सुद्धा विजय मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 115.2 षटकांत सर्वबाद 369 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 111.4 षटकात सर्वबाद 336 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 33 धावांची आघाडी घेतली होती. तरी सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 3 विकेट्सने गमावला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2003-04 साली 4 सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडमध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये रिकी पॉन्टिंगने दमदार द्विशतक करत ऑस्ट्रेलिया संघाला 556 धावांचा डोंगर उभारून दिला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात शानदार प्रदर्शन करताना 523 धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय संघाची भिंत या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने दमदार द्विशतक ठोकले होते. त्याचबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मणने शतक ठोकले होते. त्याचबरोबर भारतीय संघ पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 33 धावांनी पिछाडीवर होता.
या सामन्यात भारतीय गोलंदाज अजित आगरकर यांच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव 196 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला दुसर्या डावात विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर 6 विकेट्स गमावून हा सामना जिंकला होता.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात 1979-80 साली एक कसोटी झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 33 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या मालिका विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन ट्रोल; चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल
…म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या डोळ्यात आले पाणी
…अन् ऑस्ट्रेलियन कोच लँगर भारतीयांबद्दल असे काही बोलले, की व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ






