चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी 16 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उद्घाटन समारंभ पार पडला. उद्घाटनाचा कार्यक्रम लाहोरच्या दीवान-ए-आम किल्ल्यामध्ये घेण्यात आला. समारंभामध्ये संगीत कार्यक्रमापासून ते लाइट्स शो आणि पाकिस्तानच्या संस्कृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच याआधी दोनवेळा पाकिस्तानने उद्घाटन समारंभ घेतला होता.
मात्र काल लाहोरमधील उद्घाटन कार्यक्रम खूप उत्साहात आणि लोकांच्या सदैव आठवणीत राहील असा झाला. ज्यामध्ये पाकिस्तानचा गायक आतिफ असलमच्या गाण्यांनी मैफलीची शोभा वाढवली.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उद्घाटनाला लाहोरमध्ये प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमात पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी आणि क्रिकेटचे दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. महान खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जुन्या स्पर्धेच्या आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमात 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी झालेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. आठ वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा 180 धावांनी पराभव करून इतिहास रचला होता.
पाकिस्तानचा दिग्गज गायक आतिफ असलमने चॅम्पियन ट्रॉफीच अधिकृत गाणं गाऊन माहोल तयार केला. तसेच पाकिस्तानच्या वायुदलाने आकाशात कला दाखवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि खेळाचा इतिहास कार्यक्रमात दाखवण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमान पदाखाली खेळली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. पाकिस्तान मधील होणारे सामने लाहोर, रावलपिंडी आणि कराचीमध्ये खेळले जाणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच आठ संघात एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघासाठी हाइब्रिड मॉडल लागू केले असल्यामुळे, भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जातील. त्यामुळे भारतीय संघाने आधीच दुबईत जाऊन सराव चालू केला आहे. 17 फेब्रुवारी रोजी बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघात चॅम्पियन्स ट्रॉफीचा वॉर्म-अप सामना होणार आहे.
हेही वाचा
Birthday; एबी डिव्हिलियर्सच्या विस्फोटक फलंदाजीचे 3 विक्रम, जे आजही अभेद्य आहेत!
Champions Trophy: भारताला दुबईमध्ये कशी खेळपट्टी मिळेल? कोणत्या गोलंदाजांना मिळणार मदत?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू जखमी, पहिल्या सामन्यातून बाहेर?






