---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू जखमी, पहिल्या सामन्यातून बाहेर?

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 1:26 PM
---Advertisement---

टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सराव देखील सुरू केला आहे. भारताचा पहिला सामना बांग्लादेशशी आहे. जो 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. पण याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एका वृत्तानुसार, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला दुखापत झाली आहे. सराव करताना पंतला गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. त्याआधी बांग्लादेशशी सामना होईल. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, रिषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो खूप अस्वस्थ दिसत होता. दुखापत झाल्यानंतर पंत लगेच जमिनीवर पडला. या वेळी भारतीय संघाचे फिजिओ त्याच्यासोबत होते. पंतची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळलेले नाही.

डिसेंबर 2022 मध्ये रिषभ पंतचा कार अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. बरे झाल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण आता पुन्हा गुडघा दुखावला आहे.

भारताचा पहिला सामना बांग्लादेशशी आहे. हा सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन अद्याप जाहीर झालेला नाही. यासोबतच, रिषभ पंतबाबत कोणतीही अधिकृत अपडेट मिळालेली नाही. जर पंत तंदुरुस्त नसेल तर तो निश्चितच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडेल.

चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 साठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

हेही वाचा-

पाकिस्तानने ओलांडले नीचपणाच्या सर्व मर्यादा, कराची-लाहोर स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नाही…
जसप्रीत बुमराह की रिषभ पंत… भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणाला मिळणार?
आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, पण या दोन्ही संघांच्या कर्णधारांबद्दल आणखी पत्ता नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---