टीम इंडियाने (Team india) आशिया कप 2025 स्पर्धेच्या (Asia Cup Final) फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. सूर्या टीम इंडियाने आधीच स्पष्ट केले होते की, ते PCB प्रमुख आणि ACC अध्यक्ष मोहसिन नक्वीकडून (Mohsin Naqvi) ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. या कारणामुळेच नक्वी ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले होते. ट्रॉफी चोरी करून नेल्यानंतर टीम इंडियाला अद्याप ट्रॉफी मिळाली नाही. दरम्यान चर्चा होत होती की, नक्वीने ट्रॉफी अमिरात क्रिकेट बोर्डकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतरही टीम इंडियाला ट्रॉफी मिळाली नाही.
यामागे नक्वीची एक मोठी योजना आहे आणि त्याबाबत माहिती समोर आली आहे. नक्वीकडून ट्रॉफी घेतल्यावर वाटले होते की, भारताला ती परत दिली जाईल, पण अद्याप तसे झालेले नाही. आता रिपोर्टनुसार, आशिया कपची ट्रॉफी ACC च्या दुबई मुख्यालयात लॉक केली आहे. नक्वीने आदेश दिला आहे की, त्यांच्या परवानगीशिवाय ती ट्रॉफी तिथून हलवली जाऊ नये आणि भारताला दिली जाऊ नये. ट्रॉफी चोरी केल्यामुळे नक्वीचा खूप अपमान झाला होता, तरीही ते हार मानत नाहीत. ते अद्यापही ट्रॉफी देत नाहीत आणि त्यामुळे असे दिसते की, ICC ला त्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलावे लागेल.
मोहसिन नक्वी ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले, तरीही याचा टीम इंडियाच्या सेलिब्रेशनवर काही परिणाम झाला नाही. सूर्या ब्रिगेडने असे सेलिब्रेशन केले की, ते नेहमी लक्षात ठेवले जाईल. त्यांनी ट्रॉफी नसतानाही आनंद साजरा केला होता त्यामुळे या गोष्टीची संपूर्ण जगात चर्चा झाली. यावरून पुन्हा नक्वीला आणखी अपमान सहन करावा लागला. भारतीय चाहत्यांना टीमच्या या सेलिब्रेशनमुळे फार आनंद झाला. नंतर, वरुण चक्रवर्तीने (Varun chakrawarthy) एका कार्यक्रमात सांगितले की, अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) सूर्याला ट्रॉफीशिवाय जिंकण्याचे सेलिब्रेशन करण्याचा सल्ला दिला होता.






