---Advertisement---

अपघात झाल्यानंतर उपस्थितांकडून पंतच्या साहित्याची चोरी? व्हिडिओ पाहून होईल शेकेचं निरसन

On: शुक्रवार, डिसेंबर 30, 2022 9:03 PM
Rishabh Pant accident
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत शुक्रवारी (30 डिसेंबर) गंभीर जखमी झाला. पंत शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास दिल्लीहून त्याच्या घरी म्हणजेच रुडकीला जात असताना गाडीचा अपघात झाला. अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून पुढचा मोठा काळ तो संघातून बाहेर राहणार आहे. अपघातानंतर पंतचे पैसे आणि इतर साहित्य उपस्थितांनी लुटले असे काही माध्यमांवर सांगितले गेले. आता याविषयी पोलीस अधिकारी अजय सिंग यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या आईला न सांगता दिल्लीहून रुडकीला रवाना झाला होता. नवीन वर्ष कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी पंतने सरप्राईज देण्याचा विचार केला होता. पण त्याआधीच त्याला अपघाताला सामोरे जावे लागले. रुडकीला जात असताना त्याची गाडी रस्त्याच्या डिव्हायडर्सवर चढली आणि नंतर हवेद उडाली. गाडी चालवत असताना झोप आल्यामुळे हा प्रकार घडल्याचेही सांगितले जात आहे. अपघातावेळी पंतच्या गळ्यात तो नेहमी घातलो ती मोठी चैन आणि हातात ब्रॅसलेट देखील होते. माध्यमांमध्ये जरी पंतचे सामान चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या असल्या, तरी पोलिसांनी मात्र या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

अपघात झाला, तेव्हा पंत गाडीत एकटा होता. सुदैवाने गाडी पेटण्याआधी तो त्यातून बाहेर पडला. त्याची गाडी नंतर जळून खाक झाली, पण उपस्थित लोकांनी त्याला गाडीपासून लांब आणल्याचेही सांगितले जात आहे. याचदरम्यान, त्याचे पैसे आणि गळ्यातील चैन चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या. पण पोलीस अधिकारी अजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व बातम्या चुकीच्या आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, “रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी फोन करताच काही मिनिटांमध्येच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. आमचे चेक पोस्ट तेथून जवळच आहे, त्यामुळे पोलीस लगेच पोहोचले.”

“पंतच्या गाडीला आग लागली होती आणि त्याचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे होते. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेले. त्याने काही दागिने घातले होते. प्लॅटिनम किंवा चैन आणि एक सोण्याचे ब्रेसलेट होते. तसेच त्याच्या कपड्यांमध्ये चार हजार रुपये होते. हे सर्व त्याच्या आईकडे सोपवले गेले,” असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (The people present did not steal any material from Rishabh Pant, informed the police officer)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---