कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात पुढे येत आहे. परंतु मागील काही दिवसांत क्रिकेट चाहत्यांकडून बीसीसीआयवर टीका करण्यात आली होती. चाहत्यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, कोरोना व्हायरसच्या भयानक परिस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडून अजूनही मदत का येत नाही?
परंतु शनिवारी (२८ मार्च) बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पंतप्रधान मदत निधीमध्ये (Prime Minister Relief Fund) ५१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करत टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. ही मदत बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा (Jay Shah), बीसीसीआयचे अधिकारी आणि इतर राज्य असोसिएशन या सर्वांच्या योगदानाने करण्यात आली आहे.
यावेळी बीसीसीआयने स्पष्ट केले की, “संकटाचा सामना करण्यासाठी बोर्ड शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे. तसेच पंतप्रधान मदत निधीमध्ये योगदानही देईल.”
https://twitter.com/BCCI/status/1243924315227082752
पंतप्रधान मदत निधीची स्थापना आणीबाणी किंवा संकटसमयीच्या परिस्थितीशी दोन हात करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेटपटूंनीही हातभार लावला आहे. भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) या व्हायरसविरुद्धच्या लढाईत ५२ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ५० लाख रुपयांची मदत केली आहे. तर कॅप्टन कूल एमएस धोनीने (MS Dhoni) पुण्यातील मुकुल माधव संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टी२०मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेले ५ खेळाडू
-टाॅप ५- क्रिकेटमध्ये ट्वेंटी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, एकही भारतीयाचे नाव नाही यात
-असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून
-रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान






