देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ४ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. ही स्पर्धा आठ दिवसांमध्ये खेळली जाणार आहे आणि यामध्ये ८५ सामने खेळले जातील. ही स्पर्धा पाच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये खेळली जाणार आहे, ज्यात प्रत्येक ग्रुपमध्ये ६ संघ असतील. प्रत्येक ग्रुपमधील पहिले दोन संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचतील आणि इतर संघांचा प्रवास पहिल्या फेरीनंतर संपेल.
अशात आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंना या स्पर्धेत खेळाताना पाहायला मिळणार आहे. अपाण या लेखात अशाच पाच खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांच्याकडे या ट्रॉफीमध्ये सर्वाचेच लक्ष असणार आहे.
ऋतुराज गायकवाड (महाराष्ट्र)
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठीही त्याने महत्वाचे योगदान दिले. ऋतुराजने यावर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या १६ सामन्यांध्ये ६३५ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा केल्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेला ऋतुराज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या संघासाठी खेळतो. तो या स्पर्धेत त्याच्या संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या एकंदरीत टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १८११ धावा केल्या आहेत. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून चाहत्यांनी चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.
हर्षल पटेल (हरियाणा)
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा महत्वाचा भाग असेलेल्या हर्षल पटेलने यावर्षी आयपीएलमध्ये १५ सामन्यांमध्ये सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या. त्याने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला पर्पल कॅप आणि मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. आयपीएलनंतर आता हर्षल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याचा संघ हरियाणासाठी खेळताना दिसणार आहे. तो या स्पर्धेत संघाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असणार आहे. हर्षल २०११ पासून हरियाणा संघाचा महत्वाचा भाग आहे. त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत १११ सामन्यांमध्ये १३० विकेट्स घेतल्या आहेत.
पृथ्वी शॉ (मुंबई)
भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने आयपीएच्या यावर्षीच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने आयपीएलमध्ये यावर्षी १५ सामने खेळले आणि यामध्ये ४७९ धावा केल्या. तो यावर्षी दिल्ली कॅपिटस्लसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमधील दमदार प्रदर्शानंतर तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्याला मुंबई संघाच्या उपकर्णधाराच्या रूपात निवडले गेले. शॉच्या टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर आतापर्यंत त्याने ६७ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १६७९ धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन (केरळ)
आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केलाला संजू सॅमसन नेहमीच आयपीएलमधील एक महत्वाचा खेळाडू राहिला आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. आयपीएलमध्ये त्याने यावर्षी १४ सामने खेळले आणि यामध्ये ४८४ धावा केल्या. संजू यावर्षी राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणाला खेळाडू ठरला.
आयपीएलप्रमाणेच तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. संजूने त्याच्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत १८८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४५५० धावा केल्या आहेत.
वेंकटेश अय्यर (मध्य प्रदेश)
वेंकटेश अय्यरने आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले, त्यामुळे सर्वाचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित झाले होते. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि १० सामन्यांमध्ये तब्बल ३७० धावा कल्या. कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला असून त्याने अनेकदा संघाला महत्वाच्या वेळी विजय मिळवून दिला.
याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये तीन विकेट्सही मिळवल्या आहेत. आता तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ४८ सामन्यात १०८४ धावा केल्या आहेत. मुश्ताक अली ट्रॉफीमधील त्याच्या प्रदर्शनाकडे चाहते लक्ष ठेवून असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर
बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये! टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणार रोहित?
शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री