पाकिस्तानी समालोचक झैनाब अब्बास वनडे विश्वचषकासाठी भारतात आली होती. मात्र सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये उपस्थिती लावल्यानंतर तिला मायदेशात परत पाठवले गेले, असे सांगितले गेले होते. झैनाबने काही वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या असल्याचेही समोर आले होते. मात्र, आता पाकिस्तानची ही समालोचक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे.
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये पाकिस्तान संघ सुरुवातचे दोन सामने हैदराबादमध्ये खेळला. या सामन्यांसाठी झैनाब अब्बस (Zainab Abbas) राजीव गांधी स्टेडियममध्ये उपस्थित होती. मात्र, तिच्याविरोधात वातावरण अधिक तापत असल्याचे पाहून तिने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. झैनाबने नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट होते की, तिला आयसीसीकडून मायदेशात पाठवले गेले नाही किंवा आपल्या जबाबदारीतून मुक्त केले गेले नाहीये. तर अनुभवी समालोचक स्वतःच्या मर्जीने भारतातून पाकिस्तानमध्ये परतली आहे. सोबतच या पोस्टच्या माध्यमातून भारतीयांची माफी देखील मागितली आहे.
झैनाबच्या पोस्टमध्ये लिहिले गेले आहे की, “मला ना बाहेर जाण्यास सांगितले गेले ना मला हद्दपार करण्यात आले आहे. पण ओनलाईय येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून मी घाबरले होते. माझ्या सुरक्षेत कुठलीच जोखीन नव्हती. मात्र, माझे कुटुंब आणि सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना असणारे माझे मित्र चिंता करत होते. जे काही घडले, त्यावर विचार करण्यासाठी मला वेळ हवा होता.”
— zainab abbas (@ZAbbasOfficial) October 12, 2023
“मी समजू शकते की, सर्वत्र व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे होणारे दुःख मी समजू शकते. पण मला हे सांगायचे आहे की, त्या पोस्टमधून सध्याची मी आणि माझी मुल्ये प्रदर्शित होत नाहीत. या (पोस्टमधील) भाषेसाठी कोणतेही कारण देता येणार नाही. जे कोणी दुखावले गेले असतील त्यांची मी मनापासून माफी मागते,” असेही झैनाबने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, झैनाब अब्बास ही 2015 पासून क्रीडा पत्रकार आणि समालोचक म्हणून काम करत आहे. या क्षेत्रातील तिचा अनुभव मोठा असून 2019 मध्ये ती वनडे विश्वचषकात समालोचन करणारी पाकिस्तानची पहिली माहिला ठरली होती. (The post of Zainab Abbas, who left the World Cup halfway and returned to Pakistan, went viral)
महत्वाच्या बातम्या –
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून परतलेल्या कबड्डी संघातील खेळाडू स्नेहल शिंदेची उस्फूर्त मिरवणूक
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल