नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२ (IPL 2022 mega auction) च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूं कोट्याधीश बनले. काही दिग्गज खेळाडूंना खूपच जास्त रक्कम मिळाल्याचे दिसले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (mark wood) याला लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल ७ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. ही रक्कम स्वतः मार्क आणि त्याच्या कुटुंबासाठी अविश्वसनीय असल्याचा त्याने खुलासा केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मार्क वुड म्हणाला की, “जेव्हा मिळणाऱ्या रकमेची पुष्टी झाली, तेव्हा माझी पत्नी साराने विचारले की, हे पाउंडमध्ये किती होतात.” त्यावर मार्कने उत्तर दिले, “मला माझी सर्व खाती फ्रीज करावी लागू शकतात, जेणेकरून हा पैसा कुठे जाणार नाही. परंतु आम्ही आनंदी होतो. हा खूप अनोखा अनुभव होता. हे एखाद्या अंप्यूटर गेमप्रमाणे वाटते, वास्तव वाटत नाही. पण जेव्हा करार होतो, तेव्हा हे खूप वास्तविक देखील असते.”
यावेळी मार्कने असाही खुलासा केला की, मेगा लिलावामुळे त्यांला कुटुंबासोबत बाहेर जाण्याचे नियोजन बदलावे लागले होते. लिलावादरम्यान अनुभवी ऑक्शनर ह्यू एडमीड्स यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंत चारू शर्मा यांनी ही भूमिका पार पाडली. याविषयी बोलताना मार्क म्हणाला की, “लग्नाला वर्ष पूर्ण झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटी बाहेर जाणार होते. मी ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे यामध्ये सहभागी होऊ शकलो नव्हतो. परंतु आयपीएल ऑक्शनर आजारी पडल्यानंतर सर्वकाही थांबले आणि त्यामुळे आमच्या नियोजनात खूप उशीर झाला.”
दरम्यान, यावर्षीचा आयपीएल लिलावात दोन नवीन फ्रेंचायझींमुळे अधिक रंजक बनला. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडसाठी ७.५० कोटी रुपये खर्च केले. मार्कची बेस प्राइस २ कोटी रुपये होती. पण फ्रेंचायझींमध्ये त्याला विकत घेण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळाली. लखनऊ आणि दिल्ली संघात मार्कसाठी संघर्ष पाहायला मिळाला. त्याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सनेही त्याला खरेदी करण्याची इच्छा दाखवली होती.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची आहे ‘ही’ योजना, रिषभ पंतचा खुलासा
विराट-पंतच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी२० साठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
हरियाणा स्टिलर्स ‘टेबल टॉपर’ पटणा पायरेट्सला पराभूत करण्यात अपयशी, स्पर्धेतूनही झाले बाहेर