---Advertisement---

क्रिकेट सुरु झालं इंग्लंडमध्ये, पण आज सोनेरी इतिहास लिहीला तो भारतीयांनी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 3:58 PM
---Advertisement---

भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम सुरु आहे. या हंगामात 12 फेब्रुवारीपासून 9 फेरीला सुरुवात झाली. या फेरीत खेळला जाणारा मणिपूर विरुद्ध चंदीगढ संघातील सामन्याने क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे. व्हिडिओकॉन ऍकॅडमी ग्राउंड, कोलकता येथे पार पडलेला हा सामना 60,000 वा प्रथम श्रेणी सामना आहे.

सोमवारपर्यंत(11 फेब्रुवारी) एकूण 59,990 प्रथम श्रेणी सामने खेळले गेल्याची नोंद होती. त्यानंतर मंगळवारी(12 फेब्रुवारी) रणजी ट्रॉफीचे एकूण 18 सामने सुरु झाले. पण वेळ आणि वर्णानुक्रमे(अल्फाबेटिकली) मणिपूर विरुद्ध चंदीगढ हा सामना 10 व्या क्रमांकावर होता. त्यामुळे हा सामना क्रिकेट इतिहासातील 60,000 वा प्रथम श्रेणी सामना ठरला आहे.

क्रिकेट इतिहासात पहिला प्रथम श्रेणी सामना जून 1772मध्ये हॅम्पशायर विरुद्ध इंग्लंड संघात खेळला गेला होता. त्यानंतर जवळ जवळ 150 वर्षांनी म्हणजेच 16 जूलै 1921 ला 10,000 वा प्रथम श्रेणी सामना यॉर्कशायर विरुद्ध ससेक्स संघात खेळला गेला. त्यानंतर 50,000वा प्रथम श्रेणी सामना श्रीलंका अ विरुद्ध बांगलादेश अ संघात 19-22 मार्च 2007 दरम्यान झाला होता.

तसेच आत्तापर्यंत सर्वाधिक प्रथम श्रेणी सामने सरे संघाने खेळले आहेत. त्यांनी 3656 सामने खेळले आहेत. त्यांच्या पाठोपाठ यॉर्कशायरने 3647 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर ससेक्स तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 3524 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

त्याचबरोबर आतापर्यंत प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक धावा सर जॅक हॉब्स यांनी केल्या आहेत. त्यांनी 834 सामन्यात 61760 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक विकेट्स विलफ्रेड ऱ्होड्स यांनी घेतल्या आहेत. त्यांनी 1110 सामने खेळताना 4204 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील काही महत्त्वाचे टप्पे – 

पहिला सामना – जून 1772 – हॅम्पशायर विरुद्ध इंग्लंड

10,000 वा सामना – 16 जूलै 1921 – यॉर्कशायर विरुद्ध ससेक्स

20,000 वा सामना – 27 मे 1953 – लीसेस्टरशायर वि ग्लॉस्टरशायर

30,000 वा सामना – 9 फेब्रुवारी 1974 – कंबाईन आयलंड विरद्ध त्रिनिदाद आणि टोबॅगो

40,000 वा सामना – 30 जून 1992 – लीसेस्टरशायर वि वर्सेस्टरशायर

50,000 वा सामना – 19 मार्च 2007 – श्रीलंका अ विरुद्ध बांगलादेश अ

60,000 वा सामना – 12 फेब्रुवारी 2020 –  मणिपूर विरुद्ध चंडीगढ

https://twitter.com/Maha_Sports/status/1228247010408419328

https://twitter.com/Maha_Sports/status/1228227539790729218

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---