भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर पार पडला. ज्यामध्ये भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला. ही मालिका झाल्यानंतर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
सदर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (kl Rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे. तर जसप्रीत बुमराहला(Jasprit Bumrah) संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. काय आहे जसप्रीत बुमराहला संघाचे उपकर्णधारपद देण्यामागचे खरं कारण? चला पाहूया…
#TeamIndia for three ODI series against South Africa announced.
The All-India Senior Selection Committee has named Mr KL Rahul as Captain for the ODI series as Mr Rohit Sharma is ruled out owing to an injury.
WATCH the PC live here – https://t.co/IVYMIoWXkq
— BCCI (@BCCI) December 31, 2021
TEAM : KL Rahul (Capt), Shikhar Dhawan, Ruturaj Gaekwad, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Venkatesh Iyer, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Y Chahal, R Ashwin, W Sundar, J Bumrah (VC), Bhuvneshwar Kumar,Deepak Chahar, Prasidh Krishna, Shardul Thakur, Mohd. Siraj
— BCCI (@BCCI) December 31, 2021
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत वनडे मालिकेसाठी (South Africa vs India odi series)रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. त्याच्या ऐवजी केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. तर संघाचे उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आले आहे.
या निर्णयाने अनेकांना आश्चर्य झाले आहे. कारण या संघात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सारखे खेळाडू आहेत, ज्यांना भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे अनेकांना वाटले होते की, या दोघांपैकी एकाला संघाचे उपकर्णधारपद दिले जाईल. परंतु असे काहीच झाले नाही.
प्राप्त माहितीनुसार, हा निर्णय एका मालिकेसाठी घेण्यात आला आहे. कारण मायदेशात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी रोहित शर्मा पुनरागमन करेल. ज्यामुळे तो कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसेल. तर संघाचे उपकर्णधारपद केएल राहुल सांभाळेल.
https://www.instagram.com/p/CV0vGplKuyN/?utm_source=ig_web_copy_link
मग जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्याचे कारण काय? तर त्याचे कारण असे सांगितले जात आहे की, जसप्रीत बुमराहचे भारतीय क्रिकेट संघात असलेले सातत्य पाहता श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत असतानाही त्याला उपकर्णधारपद देण्यात आले असावे.
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांना वाटते की, जर रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघेही उपलब्ध नसते. तर, जसप्रीत बुमराहला कर्णधारपद दिले गेले नसते. परंतू, एका मालिकेसाठी म्हणून बुमराहबाबत निर्णय घेण्यात आला असावा.
तसेच ते पुढे म्हणाले की, ” जसप्रीत बुमराह हा खूप हुशार आणि अतिशय संवेदनशील युवा खेळाडू आहे. मग त्याला प्रोत्साहन का नको? मला तर हा निर्णय आवडला, जर वेगवान गोलंदाज सर्व स्वरूपात चांगली कामगिरी करत असेल तर त्याला कर्णधार का बनवता येत नाही? जोपर्यंत तुम्ही बुमराहला नेतृत्व गटात स्थान देत नाही तोपर्यंत तो काय करू शकतो हे तुम्हाला कळणार नाही. पण तरीही मला वाटतं हा निर्णय फक्त एका मालिकेसाठी आहे, तो एक सोपा निर्णय होता. राहुल आणि रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपद देण्याचा निर्णय झाला असता तर प्रकरण वेगळे असू शकले असते.”
महत्वाच्या बातम्या :
रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”
शास्त्री ‘लगे रहो’ म्हणाले आणि गाबामध्ये गिल-पंतने इतिहास रचला; वाचा सविस्तर
हे नक्की पाहा :